महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ सप्टेंबर । इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये लवकरच तब्बल 50 जागांसाठी नोकर भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना आयआयटी मुंबईकडून जारी करण्यात आली आहे. ही नोकर भरती सहायक प्राध्यापक या पदांसाठी असणार आहे. या भरतीसाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने पात्र उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2021 असणार आहे.
या पदांसाठी आहे नोकर भरती
सहायक प्राध्यापक (Assistant Professor) – एकूण जागा 50
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
पीएच.डी. प्रथम श्रेणी किंवा समकक्ष (ग्रेड इ. च्या दृष्टीने) आधीच्या पदवीवर आणि संपूर्ण शैक्षणिक रेकॉर्ड असणं आवश्यक. तसंच संबंधित इंजिनिअरिंगच्या ब्रांचमध्ये शिकवण्याचा अनुभव आवश्यक. पीएचडीनंतर किमान तीन वर्षे अध्यापन/संशोधन/व्यावसायिक अनुभव आवश्यक.
या विभागांमध्ये नोकरीची संधी
एरोस्पेस अभियांत्रिकी, बायोसायन्सेस आणि बायोइंजिनियरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, केमिस्ट्री, सिव्हिल इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग, अर्थ सायन्सेस, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, एनर्जी सायन्स अँड इंजिनियरिंग, पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकी, मानविकी आणि सामाजिक विज्ञान (अर्थशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, तत्त्वज्ञान, इंग्रजी , CISTS (संस्कृत) आणि इतिहास), गणित, यांत्रिक अभियांत्रिकी, धातू अभियांत्रिकी आणि साहित्य विज्ञान, भौतिकशास्त्र.
वेतनश्रेणी
सहायक प्राध्यापक (Assistant Professor) – 1,01,500/- रुपये प्रतिमहिना
नोकरीचा तीन वर्ष कालावधी पूर्ण केल्यानंतर – 1,31,400/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑक्टोबर 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.iitb.ac.in/mmr या लिंकवर क्लिक करा