ऑक्टोबरमध्येही पाऊस पडणार ; माघारीची अद्याप चिन्हे नाही

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. 25 सप्टेंबर । यंदा ऑक्टोबरमध्येही पाऊस पडणार असून मॉन्सूनच्या माघारीची अद्याप चिन्हे नसल्याचे हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात मॉन्सून सक्रीय राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 5 ऑक्टोबरनंतर मॉन्सूच्या माघारीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातही राज्यात पाऊस सक्रीय राहणार आहे. त्यानंतरच मॉन्सूनच्या माघारीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मुंबई आणि पुण्यातून मान्सूनच्या माघारीची तारीख 8 ते 9 ऑक्टोबरच्या आसपास असते. यंदाही याच काळात मॉन्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *