कोचिंग क्लासेसही सुरू करण्याची तयारी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ सप्टेंबर । राज्य सरकारने 4 ऑक्टोबरपासून शाळा आणि ज्युनियर कॉलेज सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर आता कोचिंग क्लासचालकांनाही क्लासेस उघडण्याचे वेध लागले आहेत. कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन ऍड सोशल फोरम महाराष्ट्र या संघटनेने शाळा, कॉलेजची समांतर व्यवस्था असलेल्या कोचिंग क्लासचालकांनादेखील क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

कोचिंग क्लासेस ही व्यवस्था पालकांच्या इच्छेवर, पालकाच्या संमतीने व पालकांच्याच आर्थिक पाठबळाने राज्यांमध्ये कित्येक वर्षांपासून सुरू आहे. गेल्या चार महिन्यांपासून शाळा-कॉलेज जरी बंद असले तरी कोचिंग क्लासेस व्यवसाय हे सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून महाराष्ट्रामध्ये जवळपास सगळीकडे सुरू आहे. अद्याप कुठेही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. याचा अर्थ कोचिंग क्लासेस संचालकांना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी आहे. मात्र राज्य सरकारचे नेहमीच कोचिंग क्लासेस व्यवस्थेकडे दुर्लक्ष होत असून आता तरी सरकारने कोचिंग क्लासेस सुरू करण्याविषयीता अधिकृत आदेश काढावा, अशी मागणी कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन ऍड सोशल फोरम ऑफ महाराष्ट्रचे राज्याध्यक्ष प्रा. बंडोपंत भुयार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *