रेल्वे प्रवाशांसाठी तिकीट बुकिंग झालं सोपं,; रेल्वेनं सुरू केली ‘ही’ नवीन सुविधा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ सप्टेंबर ।रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी कामाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक नवीन सेवा सुरू केली आहे. कोरोना काळात भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अनेक मोठे बदल केले. यातच आता रेल्वेने तिकीट बुकिंगसाठी UTS अॅपची सुविधा हिंदीत सुरू केली आहे.

रेल्वे मंत्रालयाने दिली माहिती
रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, यूटीएस मोबाईल अॅप वापरणारे आता रेल्वे हिंदी भाषेत तिकीट बुक करू शकतात. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या रिपोर्टनुसार, भारतीय रेल्वेने विकसित केलेलं हे अॅप लोकांसाठी एक नवीन सुविधा घेऊन आलं आहे. पूर्वी हे अॅप फक्त इंग्रजी भाषेत उपलब्ध होतं. पण आता त्यात हिंदी भाषा जोडली गेली आहे. यामुळे प्रवाशांना आता त्यांच्या भाषेत तिकिटं बुक करता येणार आहेत.

रेल्वे मंत्रालयानं सांगितलं की, सध्या या अॅपचे सुमारे 1.47 कोटी यूझर आहेत. हळूहळू ही संख्या आणखी वाढताना दिसू शकते. कोरोना साथीच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना तिकीट काऊंटरवरून तिकिटे मिळवण्यात खूप अडचणी येत होत्या. अशा परिस्थितीत, रेल्वेनं UTS अॅप लाँच केलं होतं. या अॅपद्वारे घरीबसुन तिकीट बुक करता येतं.

UTS अॅपवर तिकीट बुक कस करायचं ?
1. यूटीएस मोबाईल अॅपद्वारे तिकीट बुक करण्यासाठी, सर्वात आधी अॅप इंस्टॉल करा.

2. यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करावा लागेल.

3. त्यानंतर तुम्ही तुमचा आयडी इथे तयार करा.

4. या अॅपमध्ये तिकीट बुक करण्यासाठी दोन पर्याय दिसतील.

5. यावर बुक पेपरलेस आणि बुक प्रिंट यापैकी एक पर्याय निवडून तिकीट बुकिंग करता येईल.

6. तुम्ही पेपरलेसचा पर्याय निवडला, तर तुम्हाला स्टेशनवरील तिकीट वेंडिंग मशीनमधून तिकीट काढण्याची गरज नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *