गौतम गंभीरचा धोनीला मित्रत्वाचा सल्ला, म्हणाला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ सप्टेंबर । महेंद्रसिंग धोनी आणि माजी खेळाडू गौतम गंभीर यांच्यात उडाणारे खटके आता सर्वांसमोर आहेत. तर आता आयपीएलच्या यंदाच्या सीजनदरम्यान गंभीरने धोनीला एक मोलाचा सल्ला दिला आहे. गंभीरच्या म्हणण्याप्रमाणे, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आता चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यायला पाहिजे.

गौतम गंभीर म्हणाला की, चेन्नई सुपर किंग्जची टीम प्लेऑफमध्ये पात्र होताच फलंदाजीसाठी पुढे यावं. म्हणजे 4व्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा प्रयत्न करावा.

गंभीर म्हणाला की, धोनी आजकाल फक्त आयपीएलमध्ये खेळतोय. त्यामुळे फलंदाजीला उशीरा उतरतो. जर कधी सुरुवातीचे फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरला, तर धोनीवर त्याचा दबाव येईल. अशा परिस्थितीत त्याने धावा करून आपला आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे.

क्वालिफाय पात्र ठरल्यानंतर, CSK लक्षाचा पाठलाग करत असेल किंवा प्रथम फलंदाजीसाठी करत असेल त्याचा काही फरक पडत नाही. धोनीने चौथ्या क्रमांकावर उतरलं पाहिजे. मला हे घडताना पाहायचं आहे आणि आशा आहे की ते घडेल. कर्णधाराची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपण कुठे फलंदाजी करावी याचा विचार करू शकता, असंही गंभीरने म्हटलंय.

यापूर्वी देखील गंभीरने धोनीला चार नंबरवर फलंदाजी करण्याचा सल्ला दिला होता. गंभीरचा असा विश्वास आहे की, नंबर 4 ही अशी स्थिती आहे जिथे धोनी आरामात काही खेळून परिस्थितीचा अंदाजही घेऊ शकतो. जेणेकरून याचा फायदा संघालाही होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *