महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ सप्टेंबर । 1 ऑक्टोबरपासून 3 बँकेतील ग्राहकांचे चेकबुक आऊटडेटेड होणार आहेत. त्यामुळे तुम्ही जर या बँकेचे ग्राहक असाल तर येत्या 4 दिवसांमध्ये आपलं चेकबुक नवीन घ्या. नाहीतर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. 1 ऑक्टोबरपासून अलाहबाद बँक, ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांचं जुनं चेकबुक चालणार नाही.
जुनं झालेलं चेकबुक 1 ऑक्टोबरपासून चालणार नाही. त्यामुळे तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे. देशातील मोठ्या 3 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे चेकबुक आता कामास येणार नाही आहे. जर तुमचे खाते देखील या बँकांमध्ये असेल तर लगेच चेकबुक बदलावे लागणार आहे. या अशा तीन बँका आहेत ज्या नुकत्याच इतर बँकांमध्ये विलीन झाल्या आहेत. बँकांच्या विलीनीकरणामुळे, खातेधारकांच्या आयएफएससी आणि एमआयसीआर कोडमधील बदलांमुळे 1 ऑक्टोबर 2021 पासून बँकिंग सिस्टिम जुने चेकबुक स्वीकारणार नाही असं सांगितलं जात आहे.
ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या दोन्ही बँका पंजाब नॅशनल बँकमध्ये विलीन झाल्या आहेत. तिन्ही बँकांनी आपल्या ट्वीटरवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत तिन्ही बँकांचे जुने चेकबुक आणि MICR कोड चालणार आहेत. त्यानंतर मात्र ते इनव्हॅलिड होतील असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे कोणत्याही व्यत्ययाशिवाय तुम्हाला व्यवहार करायचे असतील तर चेकबुक नवीन घ्यावं लागणार आहे.
1 ऑक्टोबरपूर्वीच नवीन चेकबुक घ्या असं आवाहन सर्व बँकेच्या ग्राहकांना करण्यात आलं आहे. तिन्ही बँकेचा MICR कोड हा 1 ओक्टोबरनंतर ग्राह्य धरला जाणार नाही असं सांगण्यात आलं आहे. तुमच्या जवळच्या बँकेतून तुम्ही चेकबुक घेऊ शकता. याशिवाय इंटरनेट बँकिंगच्या मदतीनं किंवा मोबाईल बँकिंगच्या मदतीनं तुम्ही चेकबुकसाठी अप्लाय करू शकता. ऑनलाइन बँकिंग व्यवहाराची सुविधा वापरण्यासाठी या बँकांच्या खातेदारांना विलीनीकरणानंतरच्या नियमांनुसार त्यांचा जुना IFSC कोड बदलणे आवश्यक असेल. म्हणजेच, जर तुम्ही या बँकांचे ग्राहक असाल, तर सर्व अपडेट लगेच करा.