महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. 26 सप्टेंबर । सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून घसरण सुरू आहे. गुड रिटर्न्स वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार आज सोन्याचे दर (Gold Price today) स्थिर आहेत. मात्र आजंही 22 कॅरेट सोन्याचे दर 46 हजारांपेक्षा कमी आहेत. वेबसाइटवरील माहितीनुसार आज 22 कॅरेटचा दर 45,240 रुपये प्रति तोळा आहे. तर आजचा 24 कॅरेट सोन्याचा भाव (Gold price today on 26 September) 46,240 रुपये प्रति तोळा आहे. शनिवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Gold Rate on Multi Commodity Exchange) ऑक्टोबररच्या सोन्याची वायदे किंमत 46995 रुपये प्रति तोळा होती. तर सिल्व्हर फ्यूचरमध्ये देखील घसरण झाली होती. डिसेंबरच्या चांदीची किंमत (Silver Rate Today) 1.43 टक्क्यांच्या घसरणीनंतर 59920 रुपये प्रति किलोग्रॅमवर होती.
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 45,240 रुपये प्रति तोळा आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 46,240 रुपये प्रति तोळा आहे. पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा दर 44,440 रुपये प्रति तोळा आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 47,580 रुपये प्रति तोळा आहे. नागपूर मध्ये प्रति तोळा सोन्याचा भाव 45,240 रुपये ( 22 कॅरेट) आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 46,240 रुपये प्रति तोळा आह. तर आज चांदी 59,900 रुपये प्रति किलोवर आहे. या दरामध्ये जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही आहे. त्यामुळे योग्य दर जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या विश्वासातील ज्वेलर्सशी संपर्क करू शकता.
तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.