मल्हार आर्मी संघटनेच्या नुतन पदाधिकारी यांचा धनगर समाज बांधव तर्फे सत्कार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ सप्टेंबर । पिंपरी चिंचवड । (मोरवाडी ) मल्हार आर्मी महाराष्ट्र प्रदेश संघटनेच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी श्री किशोर केळे व पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षपदी श्री दिपक भोजने यांची निवड झाल्याबद्दल पिंपरी चिंचवड शहर धनगर समाज बांधवा तर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक मोरवाडी येथे सत्कार करण्यात आला प्रथम दोन्ही नुतन पदाधिकाऱी यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुजा करण्यात आली जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री गणेश एकल युवा कार्यकर्ते गणेश खरात , राजु धायगुडे , विजय महानवर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना श्री दिपक भोजने म्हणाले प्रदेश अध्यक्ष श्री सुरेशभाऊ कांबळे यांचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात प्रेरणादायक आहे ते राजकारण कमी व समाजकारण जास्त करतात त्यांनी धनगर आरक्षण ची लढाई ज्वलंत ठेवली आईचे निधनानंतर दहा दिवसांनी तुळजापूर येथून धनगर आरक्षण मशाल आंदोलनाला सुरूवात केली यावरून त्याची समाजाबद्दल आस्था कळुन येते
दिलेल्या शब्दाला जागणारा नेता अशी त्यांची ओळख आहे मला त्यांच्या संघटनेत काम करण्याची संधी मिळत आहे हे माझे भाग्य समजतो श्री किशोर केळे म्हणाले शहरात मोठ्या प्रमाणात संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करणार यावेळी युवा नेते राहुल मदने , सुधाकर अर्जुन , शहाजी दन्ने, विनोद बरकडे गोर्वधन कांबळे , गोरख बंडगर , आमोल हाके , बंडू लोखंडे , अतुल रकटे , योगेश महानवर फुलचंद बनसोडे , बंटी तरंगे , बिरुदेव मोटे , बालाजी मारकड , यशवंत बिचुकले व इतर समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन निलेश वाघमोडे , धनजंय गाडे , दादासाहेब कोपनर यांनी प्रास्ताविक केले व राहूल मदने यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *