Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
आई तुळजाभवानीचा शारदीय नवरात्रोत्सव ; लसीचे दोन डोस झालेल्यांनाच मंदिरात प्रवेश - Maharashtra 24

आई तुळजाभवानीचा शारदीय नवरात्रोत्सव ; लसीचे दोन डोस झालेल्यांनाच मंदिरात प्रवेश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ सप्टेंबर । महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव यंदाही कोरोनाच्या सावटात पार पडणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्या दिवशी नवरात्रोत्सव साधेपणानं साजरा करण्यात येणार आहे. मंदिर समितीनं दिलेल्या माहितीनुसार, यंदा नवरात्रोत्सवात दररोज 60 हजार भाविकांनाच तुळजाभवानी मातेचं दर्शन घेता येणार आहे. तसेच कोरोना काळात गर्दी टाळण्यासाठी नवरात्रोत्सवात तीन दिव, उस्मानाबाद जिल्हा बंदी असणार आहे. या काळात तुळजापुरात प्रशासनाच्या वतीनं संचारबंदीचे आदेश लागू करण्यात येणार आहेत.

पौर्णिमाला कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यासह देशभरातून अनेक भाविक तुळजापूर येथे आई तुळजाभवानी देवीचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे या तीन दिवसांत एकही वाहन किंवा भाविकांना जिल्ह्यात येण्यास बंदी असेल.

पौर्णिमेच्या आगोदर एक दिवस, पौर्णिमेच्या दिवशी आणि पौर्णिमेनंतर एक दिवस, असे तीन दिवस तुळजापुरात संचारबंदी असणार आहे. तर उस्मानाबाद जिल्हा सीमा बंदी लागू असणार आहे. या काळात सर्व प्रवेशाच्या सीमा बंद करून तिथे पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकारी यांचा कडक पोलीस बंदोबस्त असणार आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या विश्वस्त बैठकीत हे सर्व निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली आहे.

यंदाही कोरोना सावटात आई तुळजाभवानीचा शारदीय नवरात्रोत्सव, लसीचे दोन डोस झालेल्यांनाच मंदिरात प्रवेश

नवरात्रोत्सवात ज्या भाविकांनी कोरोना लसीचे 2 डोस पूर्ण केले आहेत. त्यांनाच मंदिरात प्रवेश मिळणार आहे. तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा 29 सप्टेंबर रोजी होणार असून 7 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर या काळात देवीचा नवरात्र उत्सव होणार आहे. त्यात 7 ऑक्टोबरला घटस्थापनेच्या दिवसापासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं असणार आहे. तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी आणि परिसरात कोरोना नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार असून सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्स हे नियम पाळावे लागणार आहेत.

शारदीय नवरात्र महोत्सवात 29 सप्टेंबर रोजी मंचकी निद्रानं सुरुवात होणार आहे. या काळात देवीची मुर्ती शेजघरात निद्रेसाठी ठेवली जाते.

7 ऑक्टोबर : देवीच्या मूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापनाकरून घटस्थापना होणार आहे.
8 ऑक्टोबर : श्री देवीची नित्‍योपचार पूजा आणि रात्री छबीना
9 ऑक्टोबर : रथ अलंकार महापूजा
10 ऑक्टोबर : ललित पंचमी असल्याने मुरली अलंकार महापूजा
11 ऑक्टोबर : शेषशाही अलंकार महापूजा
12 ऑक्टोबर : भवानी तलवार अलंकार महापूजा
13 ऑक्टोबर : महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा
14 ऑक्टोबर : घटोत्थापन
15 ऑक्टोबर : विजयादशमी दसरा असल्याने पहाटे सिमोल्लंघन हा विधी होणार आहे.

त्यांनतर 19 ऑक्टोबर रोजी मंगळवारी कोजागिरी पोर्णिमेनंतर श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीनं अन्नदान करण्यात येणार आहे. अशा प्रकारे शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता होईल, अशी माहिती महंत तुकोजी बुवा यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *