50 MP कॅमेरासह ओप्पोचा किफायतशीर स्मार्टफोन लाँच, अमेझॉनवर डिस्काऊंट

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ ऑक्टोबर । Oppo A55 हा भारतात लॉन्च झालेला लेटेस्ट बजेट फोन आहे. लेटेस्ट A55 पंच-होल डिझाईन, 50-मेगापिक्सेल कॅमेरा मीडियाटेक प्रोसेसर आणि मोठ्या डिस्प्लेसह येतो. ओप्पोने ए सीरिजअंतर्गत नुकतेच बजेट आणि मिड-रेंज सेगमेंटमध्ये 5G फोन सादर केले आहेत. तथापि, लेटेस्ट A55 त्यापैकी नाही. नवीन ओप्पो स्मार्टफोन अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल दरम्यान विक्रीसाठी उपलब्ध होईल, याचा अर्थ आपल्यासाठी टेबलवर अनेक ऑफर आहेत. (Oppo launches A55 in India at starting at 15,490 rupees, Check specs)

लेटेस्ट A55 ने रेनो सिरीजमधील काही डिझाईन्स कॉपी केल्या आहेत. A55 च्या मागील पॅनेलवर रेनो ग्लो तंत्रज्ञानाचा वापर केलेला नही जे आपल्याला रेनो-सीरिज फोनवर मिळते. फोनची किंमत लक्षात घेता ही काही मोठी बाब नाही. ओप्पोच्या या फोनमध्ये अँड्रॉइड 11 सॉफ्टवेअर देखील आहे, याचा अर्थ तुम्हाला यात लेटेस्ट फीचर्स मिळतात.

किंमत
Oppo A55 दोन व्हेरिएंटमध्ये येतो. याच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 15,490 रुपये आणि 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 17,490 रुपये आहे. फोन रेनबो ब्लू आणि स्टॅरी ब्लॅक रंगात येतो.

फोनचे फीचर्स
Oppo A55 6.51 इंच HD+ डिस्प्लेसह पंच-होल डिझाइनसह येतो. पंच-होलच्या आत 16 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे, जो 5P लेन्ससह येतो. फोन ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलियो जी 35 प्रोसेसरवर काम करतो ज्याचं क्लॉक स्पीड 2.3GHz इतकं आहे. यामध्ये तुम्हाला 6GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज मिळते. त्याच वेळी, यात 256GB पर्यंत मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट आहे. यूएसबी ओटीजी सपोर्ट देखील आहे. हा फोन Android 11 वर आधारित ColorOS 11 वर चालतो.

Oppo A55 च्या रियर कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सेल F1.8 प्रायमरी सेन्सर, F2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सलचा बोकेह कॅमेरा आणि F2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा समाविष्ट आहे. कोणताही कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) ला सपोर्ट करत नाही. फोनच्या साईडला फिंगरप्रिंट सेन्सर आहे, तसेच फेस अनलॉक सपोर्टही देण्यात आला आहे. Oppo A55 मध्ये 5000mAh ची बॅटरी आहे जी 18W चार्जरला सपोर्ट करते. फोन 8.40 मिमी जाड आहे आणि वजन 193 ग्रॅम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *