हे वाचा, एटीएम मशिनमध्ये होणार आहे मोठा बदल

Spread the love

महाराष्ट्र २४- नवी दिल्ली: नोटबंदीनंतर चलनात आलेली 2 हजार रुपयांची नोट सध्या व्यवहारातून कमी झाल्याचं दिसतं. सुट्टे मिळण्याची अडचण असल्यानं या नोटेचा वापर जास्त होत नाही. त्यामुळे एटीएममधून पैसे काढताना लोक 2000 रुपयांपेक्षा कमी पैसे काढण्याला प्राधान्य देतात. त्यामुळं आता अनेक बँका एटीएम 2000 रुपयांच्या नोटांच्या जागी लहान डिनॉनिनेशनच्या नोटांना वाढवणार आहे. बँकांकडून देण्यात आलेल्या माहितीत सांगण्यात आलं आहे की, एटीएममधून 2 हजार रुपयांची नोट काढल्यानंतर त्याचे सुट्टे मिळणं कठिण होतं. तसंच गेल्या काही दिवसांत असाही दावा कऱण्यात येत आहे की देशात जवळपास 2.40 लाख एटीएम मशिन्समध्ये बदल करण्यात येईल.

एटीएम मशिनमध्ये होणाऱ्या बदलामुळे लोकांना चिंता करण्याची गरज नाही. नवीन बदल केल्यानंतर पैसे काढण्याचे प्रमाण वाढेल. सर्वसामान्य लोकांना लहान डिनॉमिनेशनच्या नोटांमुळे सोपं होऊन जाईल. पुढच्या काही महिन्यांमध्ये एटीएम मशिन्स रिकॅलिबरेट केली जातील.

एटीएएम ऑपरेटर्स आणि बँक यांच्यासाठी हे मोठं आव्हान आहे. यामुळे ग्राहकांना काळजी करावी लागणार नाही. रिकॅलिबरेशन प्रोसेसमध्ये एटीएम मशिनमध्ये 2 हजार रुपयांच्या नोटांची कॅसेट काढून 500 रुपयांची कॅसेट लावण्यात येईल. एनबीएफसीचा फायदा होईल.
2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात येतील असं म्हटलं जात होतं. एटीएम मशिन्सला कॅलिबरेट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बुधवारी सांगितलं की, बँकांना कोणत्याही प्रकारचे आदेश दिलेले नाहीत. तसंच बँकांना 2 हजार रुपयांच्या नोटांचा वापर बंद करावा असं काहीही सांगण्यात आलेलं नाही. अद्याप अशा प्रकारची कोणती माहिती नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *