येणाऱ्या काळात या शेअर्सवर नजर ठेवा ; परंतु वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ ऑक्टोबर । सोमवारी अर्थात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी चांगल्या वाढीसह बंद होण्यात यशस्वी झाले. मेटल आणि मिडकॅप निर्देशांक विक्रमी उच्चांकावर बंद झाले. रिअल्टी आणि फार्मा शेअर्समध्येही चांगली खरेदी झाली. सेन्सेक्स 534 अंकांनी वाढून 59,299 आणि निफ्टी 159 अंकांनी चढून 17,691 वर बंद झाला. निफ्टी बँकेनेही 354 अंकांची वाढ केली. आज धातूची चमक आणखी वाढली आणि निर्देशांक 2 आठवड्यांच्या उच्चांकावर बंद झाला. सोमवारी ग्राहक टिकाऊ वस्तू (Consumer Durable) वगळता, सर्व निर्देशांक वाढीसह बंद झाले. निफ्टीच्या 50 पैकी 36 शेअर्समध्ये वाढ झाली. सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 23 शेअर्स वाढले. त्याच वेळी, निफ्टी बँकेच्या 12 पैकी 10 शेअर्समध्ये वाढ झाली.

आठवडाभरात कंसोलिडेशन आणि कमजोर जागतिक संकेत असूनही भारतीय बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण होते. दुसऱ्या तिमाहीचे परिणामही चांगले राहतील अशी माहिती जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या (Geojit Financial Services)विनोद नायर यांनी दिली. अर्थव्यवस्थेत फास्ट रिकव्हरी, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आधीच्या तुलनेत कमी नुकसान आणि सणांच्या पार्श्वभूमीवर बाजारात तेजी राहिल असेही नायर म्हणाले.

 

आयटी कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल यायला सुरु झाल्याचे बाजारातील तज्ज्ञ सांगतात. बाजाराच्या नजरा आता या निकालांवर आणि 8 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या RBI च्या धोरणावर आणि भाषणावर असतील. आरबीआय दरांमध्ये कोणताही बदल करणार नाही अशी आशा आहे.

तांत्रिक दृष्टिकोन (Technical View)

निफ्टीने डेली स्केलवर एक बुलिश कँडल अर्थात वाढीचा ग्राफ बनवला आहे. यामुळे गेल्या 5 सत्रांच्या लोअर हाय फॉर्मेशनला निफ्टीने सोडले आहे. आता निफ्टीला 17,777 -17,850 च्या दिशेने जाण्यासाठी 17,700 च्या वर राहावे लागेल. त्याच वेळी, खालच्या पातळीवर 17,580 -17,450 वर सपोर्ट दिसत आहे.

– डिव्हिस लॅब (Divis Lab)

– हिंडाल्को (Hindalco)

– एनटीपीसी (NTPC)

– बजाज फिनसर्व (Bajaj Finserv)

– आयआरसीटीसी (IRCTC)

– नाल्को (NALCO)

– दीपक नायट्रेट (Deepak Nitrate)

– स्टील अथॉरीटी ऑफ इंडिया (SAIL)

– टाटा मोटर्स (Tata Motors)

– बलरामपूर चिनी (Balrampur Chini)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *