महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ ऑक्टोबर । देशातील नागरिकांसाठी आधार कार्ड हे एक महत्वाचा दस्तावेज आहे. ओळख पटवण्यासाठी आधार कार्डाचा वापर केला जातो. आधार कार्डामुळे प्रत्येक नागरिकाला (UIDAI) एक विशिष्ट ओळख क्रमांक मिळत असो. 12 अंकाचा हा क्रमांक देशवासीयांसाठी महत्वाचा आहे, कारण यासोबत तुमची बायोमॅट्रीक माहिती जोडली गेलेली असते. नवजात शिशुपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत कोणीही आधार कार्ड काढू शकतो. यातल्या निळ्या रंगाच्या आधार कार्डाविषयी बऱ्याच लोकांना फारशी माहिती नाहीये.
निळ्या रंगाच्या या आधार कार्डाला ‘बाल आधार कार्ड’ असं म्हटलं जातं. मोठ्या माणसांना आधार कार्ड मिळवण्यासाठी जी प्रक्रिया पार पाडावी लागते तीच प्रक्रिया बाल आधार कार्डासाठीही पार पाडावी लागते. आधार केंद्रावर उपलब्ध असलेल्या फॉर्मसोबत तुम्हाला काही कागदपत्रे जोडून ती द्यावी लागतात. यामध्ये रहिवासाचा पत्ता, नात्याचा पुरावा ( Proof Of Relation) जन्म तारीखेचा पुरावा देणारी कागदपत्रे यांचा समावेश असतो.