घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ ; ऐन सणासुदीत सामान्यांना महागाईचा तडाखा बसणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ ऑक्टोबर । दसरा आणि दिवाळीच्या सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असतानाच सामान्य नागरिकांना महागाईचा तडाखा बसणार आहे. पेट्रोल-डिझेल, सीएनजी आणि पीएनजीपाठोपाठ आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी 6 ऑक्टोबरपासून घरगुती वापराच्या LPG साठी वाढीव दर जाहीर केले. त्यानुसार विनाअनुदानित 14.2 किलोच्या सिलेंडरच्या दरात 15 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत विनाअनुदानित गॅस सिलेंडरची किंमत 844.50 रुपयांवरुन 899.50 रुपये इतकी झाली आहे. तर दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरचा दर 884.50 रुपयांवरुन 899.50 रुपये इतका झाला आहे.

काही दिवसांपूर्वीच व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस सिलेंडरचा (LPG) भाव वाढवण्यात आला होता. एलपीजीचा भाव एक-दोन रुपयांनी नव्हे तर 43.50 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांची दुकाने, स्टॉल्स, हॉटेल्स, रेस्टारंट किंवा ढाबे अशा सगळ्यांनाच झळ बसणार आहे. या सगळ्यांकडून खाद्यपदार्थांच्या किंमती वाढवल्या गेल्यास त्याचा अंतिम फटका सामान्य नागरिकांनाच बसणार आहे. दिल्लीत व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजीसाठी 1736.50 रुपये मोजावे लागतील. यापूर्वी ही किंमत 1693 रुपये इतकी होती. तर कोलकातामध्ये हाच दर 1805 रुपये इतका झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *