महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि. ७ ऑक्टोबर । राज्यात कोरोनाची घटती प्रकरणे पाहता सर्व धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. त्यानंतर आजपासून राज्यातील सर्व मंदिरं भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे. या निमित्तानं मंदिरं सजवण्यात आली असून भाविकांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे. आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी सर्व धार्मिक स्थळे उघडली गेली. मात्रं धार्मिक स्थळं उघडताना कोरोनाचे सर्व नियम पाळले जाणार आहेत.