महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि. ७ ऑक्टोबर । मागच्या दहा महिन्यांपासून बंद असणारी महाराष्ट्रातील धार्मिकस्थळ आज (गुरुवार) घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर उघडण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. त्यानूसार लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणारे साेलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मंदिर एका अपंग सेवेकरांच्या हस्ते भाविकांसाठी दर्शनासाठी खूले करण्यात आले.
पहाटे पाच वाजता काकड आरती झाल्या नंतर काेविड १९ चे मार्गदर्शक तत्वांचे पालनातून सर्व भक्तांसाठी मंदिराचे दार उघडण्यात आले. त्यानंतर एकेक भाविकास मंदिर परिसरात साेडण्यात येत हाेते. त्यापुर्वी त्यांचे थर्मकलच्या माध्यमातून तपासणी केली जात हाेती. तसेच सामाजिक अंतर पाळण्याच्या सूचना केल्या जात हाेत्या.
मुख्य मंदिरात akkalot swami samarth temple प्रवेश करताच भाविकांच्या चेह-यावरचा आनंद आेसांडून वाहताना दिसत हाेता. श्री स्वामी सर्मथांचे दर्शन घेतल्यानंतर अनेक भाविकांनी काेराेनाचे संकट कायमस्वरुपी जाऊ देत अशी भावना व्यक्त केली.