महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑक्टोबर । उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या मालमत्तांवर आयकर विभागाकडून सलग तिसऱ्या दिवशी छापेमारी सुरुच आहे. अजित पवारांच्या सर्वात मोठ्या भगिनी, डॉक्टर रजनी इंदुलकर यांच्या बंगल्यामध्ये आयकर विभागाचे अधिकारी सलग तिसऱ्या दिवशी ठाण मांडून आहेत.