चिपी विमानतळाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑक्टोबर । Chipi airport inauguration : चिपी विमानतळाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत आदींसह मान्यवर उपस्थित होते. (Chipi airport inauguration by Chief Minister Uddhav Thackeray) दरम्यान, या कार्यक्रमाला हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे ऑनलाईन हजर होते.

चिपी विमानतळाच्या उद्घाटन समारंभाआधी राजकीय वाद उफाळून आला होता. याचे श्रेय घेण्यासाठी शिवसेना आणि नारायण राणे, भाजप यांच्यात चढाओढ दिसून येत होते. त्यामुळे आजचा कार्यक्रमाकडे लक्ष लागले होते. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे आज उद्घाटन अखेर झाले. ठाकरे आणि राणे आजच्या कार्यक्रमासाठी एकाच मंचावर येणार असल्याने या कार्यक्रमाला अधिक महत्व प्राप्त झाले. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *