महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑक्टोबर । राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता तूर्तास कोणालाही बेघर करणे योग्य नाही. त्यामुळे राज्यातील नगर, सातारा, धाराशीव, पुणे व रत्नागिरी हे जिल्हे वगळता इतर भागातील अनधिकृत बांधकामांवर 11 ऑक्टोबरपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने आज विविध महापालिका, नगर परिषद आणि स्वराज्य संस्थांना दिले.
कोरोनाची स्थिती पाहता न्यायालयाने दोन दिवसांची मुदत वाढवली असून उर्वरित पाच जिल्ह्यांत कोविडच्या प्रादुर्भावामुळे 21 ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढवली आहे. लॉकडाऊनदरम्यान न्यायालयांमधील सुलभता आणि त्यासंबंधित मुद्दय़ांबाबत ज्येष्ठ वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाला पत्र लिहिले होते. या पत्राची न्यायालयाने दखल घेतली.