Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
पुण्यात विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच दिली जाणार करोना लस – महापौर मोहोळ - Maharashtra 24

पुण्यात विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच दिली जाणार करोना लस – महापौर मोहोळ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑक्टोबर । पुण्यामधील महाविद्यालयं ११ ऑक्टोबरपासून सुरू होणा आहेत. मात्र, ज्या विद्यार्थ्यांनी करोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेले आहेत, त्यांनाच वर्गात बसण्यास परवानगी असणार आहे. या पार्श्वभूमीवर आता पुणे महापालिकेने आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता पुणे महापालिकेच्यावतीने महाविद्यालयांमध्येच लसीकरण सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती देताना सांगितले की, “लसीकरण न झालेल्या १८ वर्षांवरील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी आपल्या पुणे महापालिकेमार्फत थेट महाविद्यालय परिसरातच लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. यासाठी लवकरच आपण विशेष मोहीम राबवत आहोत.”

करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पुणे, पिंपरी-चिंचवड, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महाविद्यालये सोमवारपासून (११ ऑक्टोबर) सुरू करण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी मान्यता दिली.अजित पवार म्हणाले, की पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून महाविद्यालये सुरू केली जातील. लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार असून, बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *