ऑनलाइन शॉपिंग करताना अशी करा पैशांची बचत ; वाचा सविस्तर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑक्टोबर । प्रत्यक्ष शॉपिंगच्या तुलनेने अनेकजण सध्या ऑनलाईन शॉपिंगला महत्त्व देतात. त्यात खरेदीचा वेळ, श्रम तर वाचतातच पण शिवाय पैसे वाचवणं हा एक मुख्य हेतू असतोच. ऑनलाईन शॉपिंग करतानाही पैसे वाचवता येऊ शकतात. त्यासाठी काही सोप्या टिप्स अंमलात आणाव्या लागतील.

1. किंमत ट्रॅकिंग-
बऱ्याचदा एकच वस्तू दोन ते तीन वेगवेगळ्या साईट्सवर वेगवेगळ्या किंमतीला मिळते. अगदी खूप नसला तरी साधारण कमीत कमी 100 ते 200 रुपयांचा फरक या वेबसाईट्समधल्या किमतीत असतो. त्यामुळे आधी ती वस्तू सगळ्या वेबसाईटवर तपासून मग निवड केली जाते. हल्ली तसे काही अॅप्सही तुम्हाला वस्तुची किंमत आणि वेबसाईट्सची यादी देतात.

2. ऑर्डरची पद्धत –
कधी कधी कॅश ऑन डिलिव्हरी या पर्यायासाठी काही पैसे अधिकचे मोजावे लागू शकतात. किंवा काही वेळा नेमकी उलट परिस्थितीही असते. त्यामुळे वस्तू हातात पडल्यानंतरची किंमत आणि आधीच पैसे देण्याची किंमत यात फरक असू शकतो. तो तपासून पाहावा.

3. सेल –
हा सर्वात सोपा मार्ग आहे. सणावारांच्या निमित्ताने वेगवेगळ्या वेबसाईट्स तुम्हाला ऑफर्स देत असतात. त्यांच्यावर नीट लक्ष ठेवून तुम्ही पैसे वाचवू शकता.

4. कूपन कोड –
बऱ्याचदा आपल्याला वेगवेगळ्या अॅप्समध्ये वेगवेगळी कूपन्स मिळत असतात. त्यात काही वेळा विशिष्ट ब्रँड्सवर काही टक्के सूट दिली जाते. अशा कूपन कोडचा वापर करून तुम्ही खरेदी केलीत तर तुम्हाला मूळ किमतीवर काही सूट मिळू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *