‘या’ राशीच्या लोकांची आज पासून चांगली वेळ सुरु ; जाणून घ्या राशीभविष्य

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० ऑक्टोबर ।

मेष: (Aries Horoscope)
आज तुमच्याकडून कारण नसताना समोरच्या व्यक्तीला नुकसान पोहचू शकतं. त्यामुळे आजच्या दिवसातील बहुतांश काळ हा राग-राग करण्यातच जाईल.आरोग्य ठीक राहील .

वृषभ: (Taurus Horoscope)
आज काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्या आर्थिक आणि आरोग्यविषयकही असू शकतात. मुलांच्या वागण्या-बोलण्याचा मोठा मनस्ताप होऊ शकतो. संयम ठेवावा लागेल.

मिथुन: (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी किंवा व्यवसायात योग्य निर्णय घ्यावा लागेल. अत्यंत तंतोतंत हिशोब ठेवावा लागेल जमिनीच्या व्यवहारात न पडलेलंच बरं. दिवस अनुकूल आहे .

कर्क: (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोक आज दिवस उत्तम आहे . मोठा करार करू शकतात. कायदेशीर किंवा सामाजिक अडथळे निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. आज नशीब तुमच्याबाजुने आहे.

सिंह: (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांना आज त्यांचे विचार सकारात्मक झाल्याचा अनुभव येईल. इतरांकडून अपेक्षाही वाढू लागतील. परंतु नेहमी प्रमाणे स्वतः वर विश्वास ठेवा . धनलाभ देखील संभवतो .

कन्या: (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांच्या आर्थिक समस्या आज संपुष्टात येतील. कामाची गती मंदावल्यानं ताण निर्माण होईल. पण, नाण्याच्या नेहमी दोन बाजू असतात, हे कायम लक्षात ठेवा. चांगली वेळ सुरु होत आहे .

तूळ: (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांनी अतिआत्मविश्वास दाखवू नये. फालतू साहस दाखवण्याच्या फंद्यात पडू नका. कोणतीही नवीन कल्पना अंमलात आणण्यापूर्वी योग्य विचार करा. सकाळी काही आरोग्य समस्या उद्भवू शकतात. परंतु ते काही काळ त्याकडे दुर्लक्ष करू शकतात.

वृश्चिक: (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांना आरोग्यविषयक समस्या असेल तर दिवसाची सुरूवात करण्यापूर्वीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मनावर अतिरिक्त ताण जाणवेल. तब्येतीची काळजी घ्या . प्रवास टाळा .

धनु: (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास आहे. हे लोक खूपच भाग्यवान आहेत. आर्थिक लाभ होऊ शकतो. या लोकांना व्यवसाय-उद्योगात अडकलेले पैसे मिळतील.दिवस उत्तम जाईल .

मकर: (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांना आज काम लवकर उरकवण्यासाठी वरिष्ठांची मदत घ्यावी लागू शकते. भूतकाळात केलेल्या चांगल्या कृतीचा सन्मान होईल. लोक तुमच्याबद्दल सकारात्मक विचार करतील.

कुंभ: (Aquarius Horoscope)
गरजूंना कोणत्याही प्रकारे मदत करण्यास कुंभ राशीचे लोक आज मागेपुढे पाहणार नाहीत. चुकीच्या लोकांना मदत करू नये, याची काळजी घ्या.आज दिवस उत्तम आहे . आपली चांगली वेळ सुरु होत आहे .

मीन: (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांना कुटुंबातील सदस्यांचं पाठबळ मिळेल. नवीन प्रकल्पावर काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. कोणताही निर्णय घेताना तज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शन घ्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *