Ayurvedic Tips : हे आयुर्वेदिक उपाय बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी नक्की करा !

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ ऑक्टोबर । स्वतःला हायड्रेटेड ठेवा – निर्जलीकरण हे बद्धकोष्ठतेचे एक कारण आहे. पुरेसे पाणी पिल्याने बद्धकोष्ठता दूर होऊ शकते. बद्धकोष्ठतेसाठी हा सर्वात सोपा नैसर्गिक उपाय आहे.

# ओटमील – ओटमील प्रोटीन, फायबरचा समृद्ध स्रोत आहे. यात महत्वाची जीवनसत्त्वे आहेत जी बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करतात.

# मुलेठी हे सर्वात प्रभावी आयुर्वेदिक पदार्थांपैकी एक आहे. जे पचन सुधारण्यास मदत करू शकते. अर्धा चमचा मुलेठी (पावडर) घ्या आणि त्यात अर्धा चमचा
गूळ घाला. आता तुम्ही ते फक्त एक कप गरम पाण्यामध्ये मिक्स करून पिऊ शकता. हे बद्धकोष्ठतेसाठी सर्वोत्तम औषधी वनस्पतींपैकी एक मानले जाते.

# कोमट पाण्यात भिजवलेले अंजीर बद्धकोष्ठतेपासून त्वरित आराम देऊ शकतात. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते.

# तुम्ही गरम दुधात 1 किंवा 2 चमचे तूप मिसळून पिऊ शकता. हे बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्याचे सर्वात प्रभावी आणि नैसर्गिक उपाय आहे.

कोणाताही उपचार करण्यापूर्वी वैद्यांचा सल्ला घ्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *