JEE Advanced चा निकाल होणार 15 ऑक्‍टोबरला जाहीर! तपासा ‘या’ वेबसाइटवर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ ऑक्टोबर । JEE Advanced 2021 चा निकाल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी, खरगपूर (Indian Institute of Technology, Kharagpur) 15 ऑक्‍टोबर 2021 रोजी जाहीर करेल. परीक्षेला बसलेले उमेदवार निकाल जाहीर झाल्यानंतर jeeadv.ac.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल तपासू शकतील. निकालापूर्वी अंतिम अ‍ॅन्सर की जारी केली जाईल. JEE Advanced 3 ऑक्‍टोबर 2021 रोजी घेण्यात आली. त्याचा निकाल जाहीर होण्याची तारीख आधीच अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आली होती.

निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in ला भेट देणे आवश्‍यक आहे. पुढे, मेन पेजवर उपलब्ध JEE Advanced Result 2021 लिंकवर क्‍लिक करा. आता तुम्ही एका नवीन पेजवर याल. येथे उमेदवार त्यांचे लॉगइन क्रेडेन्शियल्स भरून लॉग इन करावे, म्हणजे रोल नंबर, जन्मतारीख आणि फोन नंबर आदी. आता तुमचा JEE Advanced निकाल (स्कोअर कार्ड) स्क्रीनवर उघडेल. त्यात दिलेला तपशील तपासा. आवश्‍यक असल्यास ते डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी निकालाची प्रिंट आउट घ्या.

जेईई अ‍ॅडव्हान्स्डमध्ये यशस्वी घोषित झालेल्या उमेदवारांना समुपदेशनानंतर आयआयटीमध्ये प्रवेश मिळेल. जागा वाटपासाठी समुपदेशन प्रक्रिया 16 ऑक्‍टोबरपासून सुरू होईल. गुणवत्तेच्या आधारावर जागा वाटप केल्या जातील. जॉइंट सीट अलोकेशन अ‍ॅथॉरिटी (JoSAA) अधिकृत वेबसाइटवर समुपदेशन प्रक्रिया पूर्ण करेल. तथापि, समुपदेशनाचे वेळापत्रक अद्याप JoSAA च्या अधिकृत वेबसाइटवर जारी केले गेले नाही. JEE Advanced चा निकाल जाहीर झाल्यानंतर समुपदेशनाची विंडो उघडली जाईल.

हे जाणून घ्या, की JEE Advanced साठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 16 सप्टेंबर ते 20 सप्टेंबरपर्यंत चालली. त्याचबरोबर उमेदवारांना फी भरण्यासाठी 21 सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. 25 सप्टेंबर रोजी परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांचे प्रवेशपत्र जारी करण्यात आले. त्याच वेळी, तात्पुरती अ‍ॅन्सर की 10 ऑक्‍टोबर रोजी जारी करण्यात आली आणि 11 ऑक्‍टोबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत हरकती दाखल करण्याची वेळ देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *