महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ ऑक्टोबर । गेल्या दोन वर्षांपासून कोविडमुळं दिवाळी पहाटं सारखे सार्वजनिक कार्यक्रम होऊ शकले नव्हते मात्र यंदा दिवाळी पाहटसारखे कार्यक्रम घेण्यास राज्य सरकारनं परवानगी दिली आहे. तसेच यासंदर्भात नव्या एसओपी देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार येत्या २२ ऑक्टोबरपासून सिनेमागृह, नाट्यगृह त्याचबरोबर बंदिस्त सभागृह आणि मोकळ्या जागेत होणारे सांस्कृतीक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे.
सांस्कृतीक कार्यक्रमांसाठी नियमावली
कार्यक्रमाला प्रवेश देताना शरिराचं तापमान तपासणं बंधनकारक
बंदिस्त सभागृहात एकूण क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांना परवानगी
मोकळ्या जागेतील कार्यक्रमांसाठी कार्यक्रमांच्या ठिकाणी ६ फुटांचं अंतर राखणं बंधनकारक
मोकळ्या जागेतील कार्यक्रमाचं स्वरुप बघून स्थानिक प्रशासन देणार परवानगी
कार्यक्रमाचे आयोजक, प्रेक्षक या सर्वांना मास्क घालणं बंधनकारक
बालकलाकारांव्यतिरिक्त सर्वांचे लसीकरण पूर्ण झालेलं असणं बंधनकारक
गर्दीच्या नियंत्रणासाठी आयोजकांकडे सुरक्षा व्यवस्था असावी
खुल्या जागेत कार्यक्रमस्थळी खाद्यपदार्थ, पेय विक्रीला बंदी
रंगभूषाकारांना पीपीई कीट वापरणं बंधनकारक