राशीभविष्य ; या राशींच्या जीवनात घडणार मोठा बदल

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ ऑक्टोबर ।

मेष:-
आज दिवस उत्तम आहे . मान्य नसलेल्या गोष्टीला सहमती दर्शवू नका. संमिश्र घटना घडतील . लाभाच्या काही संधी प्राप्त होतील. गुंतवणूक लाभदायक ठरेल. धार्मिक गोष्टीत मन रमेल.

वृषभ:-
आज दिवस उत्तम जाईल . भागीदारीत काळजीपूर्वक पैसा गुंतवा. अतिघाई टाळा. इतरांचे म्हणणे ऐकून घ्या. चटकन निर्णयावर येऊ नका. मानसिक शांतता जपावी.आरोग्य जपा

मिथुन:-
आज दिवस शुभ आहे . स्वत:वर खर्च करा. पराक्रम योग्य ठिकाणी दाखवा. नफा-तोट्याकडे लक्ष ठेवा. हितशत्रूंचा त्रास संभवतो. कामातील बदलांना सामोरे जा. जीवनात चांगले बदल होतील .

कर्क:-
आज अती लोभ टाळावा. आपली जोखीम ओळखून कामे करा. दिलासादायक दिवस जाईल. कुटुंबातील सदस्य समजून घेतील. कामातून मनासारखे समाधान मिळेल.आरोग्य उत्तम राहील .

सिंह:-
आज व्यावसायिक संधीकडे लक्ष ठेवा. हातातील अधिकार वापरता येतील. नवीन अनुभव गाठीशी बाळगाल. आवडीच्या वस्तु खरेदी कराल. आनंद वार्ता मिळू शकतील. दिवस उत्तम जाईल .

कन्या:-
आज योग्य सल्ल्याने लोकांचे समाधान कराल. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा. जवळचे नातेवाईक भेटतील. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. जुन्या गोष्टी विसरून पुढे जा.आरोग्य सांभाळा .

तूळ:-
आज नवीन संधीने खुश व्हाल. थोडी तडजोड करावी लागेल. अती श्रमामुळे थकवा जाणवू शकतो. कौटुंबिक गैरसमज दूर करावेत. ज्येष्ठ मंडळींची गाठ पडेल. दिवस उत्तम जाईल .

वृश्चिक:-
आज प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. मुलांची स्वतंत्र मते समजून घ्या. क्षुल्लक कारणांवरून चिडू नका. केवळ कामावर लक्ष केंद्रित कराल. वादाचे प्रसंग टाळा.

धनू:-
आज दिवस मनासारखा घालवाल. मनाला चांगल्या विचारात गुंतवून ठेवा. कौटुंबिक समस्या प्राधान्याने सोडवाव्यात. समाधानकारक घटना घडतील. जोडीदाराशी मतभेद संभवतात.

मकर:-
आज तुमच्या शांत स्वभावाचा लोक गैरफायदा घेऊ शकतात. मानसिक स्वास्थ्य हरवू नका. समोरील प्रश्न शांतपणे सोडवावेत. उत्साहाने दिवसभर कार्यरत रहा. धार्मिक ग्रंथांचे वाचन चालू ठेवा.

कुंभ:-
आज चटकन धाडसी निर्णय घेऊ नका. मनातील इच्छा पूर्ण होईल. गुरुजनांचा सल्ला विचारात घ्या. वेळेचा सदुपयोग करावा. लाभाची संधी सोडू नका.आर्थिक लाभ संभवतो .

मीन:-
आज व्यावसायिक ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. केलेल्या कामाचे समाधान मिळेल. तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल. अडकलेले पैसे प्राप्त होऊ शकतील. शक्तीच्या जोरावर समस्या सोडवू शकाल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *