दसऱ्याचा मुहूर्त.. सुवर्णनगरीत खरेदीसाठी गर्दी; मोठी उलाढाल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ ऑक्टोबर । दसरा अर्थात विजयादशमी आज असल्याने सोने- चांदीची आपट्याची पाने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची जळगावातील सुवर्णनगरीत मोठ्या प्रमाणात गर्दी केली. (jalgaon-news-dasara-utsav-gold-market-showroom-full-costmer)

सोने खरेदीसाठी साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच दसरा (विजयादशमी) हा मुहूर्त आज आल्याने सोने खरेदीसाठी जळगाव येथील सुवर्णनगरीत ग्राहकांनी मोठी गर्दी केली. दसऱ्याचा दिवस सोने खरेदीसाठी शुभ मानला जातो. या दिवशी सोने खरेदी केल्याने भरभराट होते अशी धारना असल्याने या दिवशी लोक मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतात. त्यातच विशेष म्हणजे दसऱ्याला महत्व असणारे आपट्याची पाने हे सोन्या चांदीच्या रूपात उपलब्ध होत असल्याने या पानाच्या खरेदीसाठी ग्रहकांची गर्दी होताना दिसून येत आहे.

दसऱ्याच्या दिवशी अनके ग्राहकांचा सोने- खरेदीकडे कल असतो. त्यामुळे सराफ बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सोने आणि चांदीच्या खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ सुरू झाली असून आतापसूनच ग्राहकांनी सोने खरेदीसाठी सराफ बाजरात गर्दी केलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *