” या ” राशींना रविवार लाभदायक ; पहा आजचे राशीभविष्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ ऑक्टोबर ।

मेष:-
आज दिवस अत्यंत शुभ असून ग्रह तुमच्यावर प्रसन्न आहेत. आर्थिक, धार्मिक,सामाजिक पातळीवर तुम्ही चमकणार आहात. प्रसिद्धी मिळेल.मात्र गृह कलहामुळे मन उद्विग्न होईल. आपली चिडचिड इतरांना दाखवू नका. संयम बाळगून वागा. नकारात्मक घटना फार मनावर घेऊ नका. कटू गोष्टी अनुकूल करण्याची कला शिकून घ्या. प्रिय व्यक्तीच्या भेटीचा योग.

वृषभ:-
धार्मिक ग्रंथांचे वाचन होईल. व्यवसायात नीतिचा मार्ग अवलंबा. आजचा दिवस समाधानकारक ठरेल. नवीन ओळखीतून प्रतिष्ठा लाभेल. अप्रिय व्यक्तींची भेट त्रासदायक ठरेल.आज कार्यालयीन काम सुरळीत पार पडेल. जास्त श्रम पडले तरी यश मिळेल. घरांमधे काही जबाबदारी येईल. ती तुम्ही व्यवस्थित पार पाडाल. अति संवेदनशील होणे टाळा. दिवस शुभ आहे.

मिथुन
आज छोटे प्रवास संभवतात. मौल्यवान वस्तु प्राप्त होतील. संतती सुख चांगले. आर्थिक स्थिती ठीक राहील. दिवस उत्तम.मित्र व नातेवाईकांशी सलोख्याने वागा. उगाच वाईटपणा घेऊ नका. मौल्यवान वस्तु जपाव्यात. मुलांकडून शुभ वार्ता मिळेल. जुनी कामे मार्गी लावाल.

कर्क:-
नवीन कामाकडे लक्ष ठेवा. जे मिळेल ते पदरात पाडून घ्या. सन्मानात वाढ होईल. मुलांच्या जबाबदार्‍या व्यवस्थित पार पाडाल. कुटुंबातील सदस्य चांगली बातमी देतील. वाचन, अभ्यास इत्यादी मध्ये यश देतील. आर्थिक स्थिती ठीक राहील. अचानक लाभ होईल. भावंडाची भेट होईल. प्रकृती जपा. पोटाचे त्रास संभवतात. दिवस मध्यम.

सिंह:-
कौटुंबिक तिढा सोडवायला मदत कराल. मिळकतीचा नवीन स्त्रोत उत्पन्न होईल. एखाद्या कामासाठी अधिक धावपळ करावी लागेल. बोलण्यातून माधुर्य दर्शवाल. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. या राशीच्या व्यक्तींना हा काळ मान मिळवून देणारा आहे. प्रतिष्ठा वाढेल. भावंड खुश राहतील. आर्थिक उलाढाली होतील. जोडीदाराला वेळ द्यावा लागेल. नवीन व्यवसाय पूरक घटना घडतील. दिवस चांगला.

कन्या:-
जुन्या आजारांवर वेळीच लक्ष द्या. कोणतीही गोष्ट पुढे ढकलू नका. धनसंचयात वाढ होईल. व्यापारी क्षेत्रातील व्यक्तींना अपेक्षित यश मिळेल. चांगल्या गोष्टीसाठी खर्च कराल. लिखाण वाचन यात शुभ फळ . बुद्धी चा उत्तम वापर करून यश मिळवा .सौंदर्य प्रसाधन खरेदी होतील. आर्थिक स्थिती ठीक राहील. दिवस चांगला.

तूळ:-
आनंदाची अनुभूति घ्याल. कार्यालयीन वातावरण अनुकूल राहील. एखादा मोठा व्यवहार पार पडेल. घरातील लोकांचा आनंद द्विगुणित होईल. मानसिक प्रसन्नता लाभेल.भरभराटीचा दिवस आहे. मात्र कायद्याचे उल्लंघन करू नका. सामाजिक जबाबदाऱ्या जपून घ्या. आर्थिक नियोजन नीट करा. दिवस बरा जाईल.

वृश्चिक:-
वडिलोपार्जित धनाचा लाभ होईल. कोणत्याही संशयित कामात अडकू नका. पराक्रमात वाढ होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. अधिक धावपळ झाल्याने आराम करण्यावर भर द्यावा.आज घरात होणार्‍या काही समारंभाची तयारी, आखणी कराल. त्यानिमित्त खरेदी होईल. कार्यक्षेत्रातील प्रगती सुरू राहील. आर्थिक बाजू ठीक राहील. दिवस चांगला जाईल.

धनू:-
जुन्या धार्मिक कथांचे श्रवण कराल. मन:शांती लाभेल. विरोधक माघार घेतील. एखाद्या व्यक्तीची भेट संस्मरणीय ठरेल. सासरच्या व्यक्तींकडून लाभ मिळेल.छोटे प्रवास, गाठीभेटी, संवाद असा हा दिवस आहे. मनोरंजनात्मक कार्यक्रम ठरतील. कुटुंब सुख मिळेल. आर्थिक बाजू जपा. काहींना भावंडाची साथ मिळेल. दिवस चांगला.

मकर:-
आज दिवस आनंदात जाईल. जुनी सर्व कामे मार्गी लावाल. आर्थिक व्यवहारात यश येईल. जुने प्रयत्न फलद्रुप होतील. कार्यालयीन सदस्य कौतुक करतील.आर्थिक व्यवहार, अचानक धनलाभ असा दिवस आहे. मात्र प्रकृती बाबत काळजी घ्या. कुटुंब,वाणी आत्मविश्वास पूर्ण राहील. दिवस चांगला.

कुंभ:-
मानसिक गुंतागुंतीत अडकू नका. विचारपूर्वक पाऊले उचला. निराशाजनक घटना दुर्लक्षित कराव्यात. अडचणीतून मार्ग निघेल. शक्यतो कोणत्याही वादात अडकू नका.आध्यात्मिक प्रगती होईल. अष्टमात ग्रह सावधगिरीचा इशारा देताहेत . घरातील शांतता भंग होऊ नये म्हणुन सजग रहा. कुठेही अनावश्यक खर्च टाळा. दिवस शुभ.

मीन:-
घरात नवीन वस्तूंची खरेदी केली जाईल. जुने परिचित लोक भेटतील. भावंडांना मदतीचा हात पुढे कराल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. प्रवासात सावधगिरी बाळगणे हिताचे ठरेल.धार्मिक समारंभ, नातेवाईकांच्या गाठी भेटी, त्यानिमित्ताने खर्च, देणेघेणे पार पडेल. प्रकृती जपा. आर्थिक बाजु ठीक राहील. शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाही. दिवस मध्यम जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *