पेट्रोलची दिवाळी : सर्वत्र शंभरी गाठली, डिझेलही 12 राज्यांत शंभरीपार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ ऑक्टोबर । देशभरात पेट्रोलची दिवाळी सरू आहे. इंधनाच्या किमतीने नवा विक्रम केला आहे. पेट्रोल-डिझेलचे दर सर्वसामांन्यांच्या आवाक्याबाहेर गेले असून शनिवारी पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या प्रतिलिटर प्रत्येकी 35 पैशांची वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे पेट्रोलच्या किमतीने शंभरी गाठली तर डिझेलही गोवा आणि बंगळुरूसह 12 राज्यांत शंभरीपार पोहोचले आहे.

सप्टेंबरपासून पेट्रोलच्या किमतीत 15 वेळेस तर डिझेलच्या किमतीत 18 वेळेस वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल 105.49 रुपये लिटर तर मुंबईत 111.43 रुपये लिटरवर गेले आहे. तर मुंबईत डिझेलचे दर 102.15 रुपये लिटर तर दिल्लीत 94.22 रुपये लिटर आहे. देशातील अनेक राज्यांत पेट्रोल–डिझेलच्या किमतीने शंभरी गाठली आहे. त्यात मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगढ, बिहार, केरळ, कर्नाटक, लडाख या राज्यांत पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *