आजपासून टी-20 वर्ल्ड कपचा थरार , पहिल्याच दिवशी दोन लढतींची रंगत

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ ऑक्टोबर । टी-20 वर्ल्ड कपचा थरार तब्बल पाच वर्षांनंतर अनुभवायला मिळणार आहे. ओमान व यूएई या दोन देशांमध्ये उद्यापासून टी-20 या प्रतिष्ठेच्या क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पहिल्या फेरीतील लढती उद्यापासून खेळवण्यात येणार असून 23 ऑक्टोबरपासून ‘सुपर 12’ फेरीला सुरुवात होईल. या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी ओमान भिडणार पीएनजीला तर स्कॉटलंडसमोर बांगलादेशचे आव्हान असणार आहे. 16 देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत 45 लढती पार पडणार असून 14 नोव्हेंबरला जेतेपदाचा फैसला होणार आहे.

पहिल्या फेरीला रविवारपासून सुरुवात होणार आहे. या फेरीमध्ये आठ देश ‘सुपर 12’ फेरीत पात्र ठरण्यासाठी जिवाचे रान करताना दिसतील. श्रीलंका व बांगलादेश हे दोन संघ पुढल्या फेरीसाठी पात्र ठरतील अशी शक्यता क्रिकेटतज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे. तसेच आयर्लंड, नेदरलॅण्ड, स्कॉटलंड व ओमान या संघांमध्ये ‘सुपर 12’ फेरीत पात्र ठरण्यासाठी रस्सीखेच लागू शकते.

यजमान देश व रँकिंगमधील सर्वोत्तम देशांना थेट ‘सुपर 12’ फेरीसाठी पात्र ठरवण्यात आले आहे. गट एकमध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडीज या देशांचा समावेश असून गट दोनमध्ये अफगाणिस्तान, हिंदुस्थान, पाकिस्तान व न्यूझीलंड या देशांचा समावेश आहे. पहिल्या फेरीतील सर्वोत्तम कामगिरी करणाऱया चार संघांना दोन्ही गटांत प्रत्येकी दोन संघांप्रमाणे समाविष्ट केले जाणार आहे.

या लढतींवर असणार नजरा

23 ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका, अबुधाबी

23 ऑक्टोबर – इंग्लंड-वेस्ट इंडीज, दुबई

24 ऑक्टोबर – हिंदुस्थान-पाकिस्तान, दुबई

30 ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया-इंग्लंड, दुबई

31 ऑक्टोबर – हिंदुस्थान-न्यूझीलंड, दुबई

6 नोव्हेंबर – इंग्लंड-दक्षिण आफ्रिका, शारजा

पहिल्या फेरीतील चार संघांना पुढल्या फेरीत प्रवेश मिळणार

पहिल्या फेरीत प्रत्येकी चार देशांचे दोन गट तयार करण्यात आले आहेत. ‘ए’ गटामध्ये आयर्लंड, नामिबिया, नेदरलॅण्ड व श्रीलंका या देशांचा समावेश आहे. ‘बी’ गटामध्ये बांगलादेश, ओमान, पीएनजी स्कॉटलंड या देशांचा समावेश आहे. दोन्ही गटांतील सर्वोत्तम दोन संघ पुढल्या अर्थातच ‘सुपर 12’मध्ये प्रवेश करतील.

पहिल्या फेरीतील गटवारी

गट ए – आयर्लंड, नामिबिया, नेदरलॅण्ड, श्रीलंका

गट बी – बांगलादेश, ओमान, पीएनजी, स्कॉटलंड

सुपर 12 फेरीतील गटवारी

गट एक – इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, ए वन, बी 2

ग़ट दोन – अफगाणिस्तान, पाकिस्तान, हिंदुस्थान, न्यूझीलंड, ए 2, बी 1

आजच्या लढती

ओमान–पीएनजी, गट बी

अल अमिरात, दुपारी 3.30 वाजता

बांगलादेश–स्कॉटलंड, गट बी

अल अमिरात, रात्री 7.30 वाजता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *