Career In Travel : बनवा करिअर; जॉबच्या आहेत अनेक संधी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ ऑक्टोबर । जर तुम्हाला नवनवीन ठिकाणी प्रवास करायला आवडत असेल आणि मार्केटिंगमध्ये देखील स्वारस्य असेल तर तुम्ही ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये करिअर (Career In Travel Industry) करू शकता. कोरोना (Coronavirus) महासाथीदरम्यान या उद्योगावर वाईट परिणाम झाला असला तरी, परंतु आता त्याची हरवलेली चमक पुन्हा परत येऊ लागलीय. या क्षेत्रात करिअरच्या विविध संधी असून तुम्ही त्यात तुमचे करिअर करू शकता.

ग्रॅज्युएशननंतर बरेच लोक त्यांच्या करिअरबद्दल खूप चिंतित असतात. जर तुम्हीही करिअरबाबत विचार करत असाल किंवा तुमचे नातेवाईक-मित्र यांना काही नवीन गोष्टींमध्ये काम करायचे असल्यास ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये करिअर करू शकता. याच क्षेत्रीतील एक करिअर म्हणजे टूर मॅनेजर (Career As Tour Manager).

ट्रॅव्हल आणि टूरिझम इंडस्ट्रीमध्ये टूर मॅनेजरचे काम पर्यटकांच्या टूरचे व्यवस्थापन करणे आहे. त्यांना टूर ऑपरेटर असेही म्हटले जाते आणि कधीकधी त्यांना टूर गाईड म्हणून काम करावे लागते. ते पर्यटकांना पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी हॉलिडे पॅकेज तयार करतात. त्यांना पर्यटकांच्या सोयीची खूप काळजी घ्यावी लागते. टूर व्यवस्थापक जगातील कोणत्याही कोपऱ्यात पर्यटकांना मनोरंजक आणि विशेष ठिकाणी घेऊन जाऊ शकतात. टूर मॅनेजर अनेक भाषा, इतिहास आणि भूगोलामध्ये पारंगत असावा.

-उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण केलेली असावी.

-उमेदवारांनी एव्हिएशन मॅनेजमेंट, ट्रॅव्हल अँड टूरिझम मॅनेजमेंट (टूर मॅनेजर स्किल्स) मध्ये पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे.

-आयएटीए प्रमाणपत्र/डिप्लोमा इन ट्रॅव्हल अँड टुरिझम असलेल्या उमेदवारांनाही प्राधान्य दिले जाते.

-पर्यटन उद्योगाशी संबंधित कामाचा पूर्व अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जातं.

टूर मॅनेजर कोर्स पूर्ण केल्यानंतर, एखाद्याला सरकारी तसेच खासगी आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये सहज नोकरी मिळू शकते. नामांकित खासगी कंपन्यांव्यतिरिक्त, तुम्ही पर्यटन विभाग, हॉटेल उद्योग, विमान कंपन्या आणि प्रवासी संस्था (टूर मॅनेजर करिअर स्कोप) मध्ये देखील नोकरीसाठी अर्ज करू शकता. सुरुवातीला महिना 20 ते 25 हजार रुपयांनंतर या क्षेत्रात लाखो रुपयांपर्यंत कमाई करता येऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *