‘केटीएम’च्या दोन नवीन दुचाकी बाजारात

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ ऑक्टोबर । भारतामध्ये स्पोर्ट्स रेसिंग दुचाकीची विक्री करणारी कंपनी ‘केटीएम’च्या आरसी सीरीजच्या दोन दुचाकी सादर करण्यात आल्या आहेत. यामध्ये मॉडेल 2022 केटीएम आरसी 125 आणि 2022 केटीएम आरसी 200 यांचा समावेश आहे. 2022 आरसी 125 ची एक्स शोरुम किमत 1.82 लाख रुपये आहे. तर 2022 केटीएम आरसी 200 या मॉडेलची किमत ही 2.09 लाख रुपये राहणार असल्याची माहिती आहे. नवीन गाडी आरसी 125 मागील मॉडेलच्या तुलनेत जवळपास 2 हजार रुपयांनी महाग आहे. आगामी काळात भारतीय बाजारात केटीएम आरसी 390 हे मॉडेल सादर करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने यावेळी दिली आहे.

इंजिन : 2022 केटीएम आरसी 200 मध्ये जुने 25.5 बीएचपी पॉवर 199.5 सीसी लिक्विड कूल्ड इंजिन मिळणार आहे. यामध्ये कंपनीने आता यात एअरबॉक्सची सोय केली आहे. दुसरीकडे नवीन आरसी 125 मध्ये 124.2 सीसी सिंगल इंजिन मिळणार आहे.

नवीन मॉडेलमध्ये कंपनीने अगोदरच्या मॉडेलपेक्षा विविध बदल केले आहेत. यामध्ये नवीन एलइडी हेडलँप सेटअपसोबत एलसीडी इंस्ट्रूमेंट कंसोलची सेवा दिली आहे. 13.7 लिटर फ्यूल टँक मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *