भारत दौऱ्यासाठी डिकॉक च्या नेतृत्वात अफ्रिकन संघाची घोषणा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४; मुंबई – आयपीएलपूर्वी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार असून या दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. या मालिकेला १२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. अफ्रिकन संघात माजी कर्णधार फाफ ड्युप्लेसीला देखील स्थान मिळाले असून त्याच्यासह रस्सी वॅन-डर डुसेन हा देखील भारत दौऱ्यावर येणार आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरीच्या जोरावर फिरकीपटू जॉर्ड लिंडे याला देखील १५ सदस्यीय संघात स्थान देण्यात आले आहे.

क्विंटन डि कॉकच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा संघ १२ मार्चला धर्मशाला, १५ मार्चला लखनऊ तर १८ मार्चला कोलकाताच्या मैदानात भारतीय संघासोबत भिडणार आहे.

दक्षिण आफ्रिकेचा संघ : क्विंटन डिकॉक (कर्णधार), टेम्बा बव्हुमा, रस्सी वॅन-डर डुसेन , फाफ डु प्लेसी, कायल वेरेन, हेन्री क्लासें, डेविड मिलर, जेजे स्मट्स, एंडिले फेहलुकवायो, लुंगी एनगिडी, लुथो सिपाम्ला, ब्यूरेन हेंड्रिक्स, एनरिच नोर्ट्जे, जॉर्ज लिंडे, केशव महाराज.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *