पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, रविवारी सोशल मीडिया सोडणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४; – नवी दिल्ली : आपलं काम लोकांपर्यंत पोहोचवण्याबरोबरच नवीन संकल्पना मांडण्यासाठी राजकारण्यांकडून सोशल मीडियाचा वापर केला जातो. ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब हे त्यासाठी प्रभावी व्यासपीठ समजलं जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असतात. मात्र याच सोशल मीडियासंदर्भात नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे.

 

‘या रविवारी मी ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब यावरील माझी खाती सोडण्याचा विचार करत आहे,’ असं ट्वीट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मोदींनी असं अचानक सोशल मीडिया सोडण्याचा विचार व्यक्त केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, नरेंद्र मोदी हे सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो केले जाणारे राजकीय नेते आहेत. इंस्टाग्रामवर 3 कोटी 52 लाख, ट्विटरवर 5 कोटी 33 लाख आणि फेसबुकवर 4 कोटी 45 लाख लोक मोदींना फॉलो करतात, तर नरेंद्र मोदी यांच्या यूट्यूब चॅनेलला 45 लाख सबस्क्राईबर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *