पिंपरीत चौघांना अटक ; शरीरयष्टीसाठी इंजेक्शनची बेकायदा विक्री

 133 total views

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ ऑक्टोबर । मेफेन्टरमाइन सल्फेट (Mephentermine Sulfate) या इंजेक्शनची बेकायदा विक्री करणाऱ्या चौघा जणांना पुण्यात अटक करण्यात आली आहे. बिबवेवाडी पोलिसांनी चार जणांना जेरबंद केलं. त्याच्याकडून या इंजेक्शनच्या 211 बाटल्या आणि एक स्विफ्ट कार असा एकूण 2 लाख 6 हजार 548 रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला.

परेश रेणूसे, प्रविणसिंग भाटी, अक्षय वांजले, शौनक संकपाळ अशी अटक करण्यात आलेल्या चौघा आरोपींची नावे आहेत. रेणूसे हा जिम ट्रेनर म्हणून काम करतो. मेफेन्टरमाइन सल्फेट हे इंजेक्शन हृद्यदाब वाढवण्यासाठी केला जातो. एमडी आणि एमबीबीएस पदवी असलेल्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय या इंजेक्शनची विक्री करता येत नाही. असं असतानाही हे चौघे जण जिममध्ये येणाऱ्या तरुणांना शरीरयष्टी वाढवण्यासाठी या इंजेक्शनची बेकायदा विक्री करत होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *