महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २०ऑक्टोबर । सरकारी तेल कंपन्यांनी सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी त्यांच्या किमती वाढवल्या आहेत. दिल्लीत आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 35-35 पैसे वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्यानंतर दिल्लीत पेट्रोलची किंमत 106.19 रुपयांवर पोहोचली आहे आणि डिझेलची किंमत 94.92 रुपये प्रति लीटरवर पोहोचली आहे.
देशाच्या प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमती
शहर पेट्रोल (रुपए/लीटर) डीजल (रुपए/लीटर)
श्रीगंगानगर 118.32 109.12
अनूपपुर 117.63 106.76
परभणी 114.64 103.75
भोपाल 114.81 104.15
जयपूर 113.38 104.58
मुंबई 112.11 102.89
20 दिवसांमध्ये 15 व्यांदा वाढल्या किंमती
या महिन्यात केवळ 20 दिवसात पेट्रोल-डीझेल 15 वेळा महाग झाले आहे. यामुळे राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल 4.55 आणि डिझेल 5.05 रुपये महाग झाले आहे. तर 2021 विषयी बोलायचे झाले तर यावर्षी 1 जानेवारीला पेट्रोल 83.97 आणि डिझेल 74.12 रुपये प्रति लीटर होते. आता हे 106.19 आणि 94.92 रुपये प्रति लीटरवर आहे. म्हणजेच 10 महिन्यापेक्षाही कमी वेळेत पेट्रोल 22.22 आणि डिझेल 20.80 रुपयांपर्यंत महाग झाले आहे.