Alert! ITR Filing सह ही कामं 31 ऑक्टोबरपूर्वीच करा पूर्ण, अन्यथा होईल नुकसान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २०ऑक्टोबर । हा महिना (October 2021) संपण्यासाठी फक्त 10 दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत, 31 ऑक्टोबर पर्यंत अनेक महत्वाची कामे करण्याची शेवटची (Deadline for Many important works) तारीख आहे. या दरम्यान, जर तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे. त्याचबरोबर पीएम किसान योजनेत (PM Kisan Scheme Registration) नोंदणीची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर आहे. आज आम्ही तुम्हाला अशा 4 महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहोत ज्या या महिन्याच्या अखेरपर्यंत करणं अत्यंत आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागेल.

१. HDFC विशेष ऑफर

जर तुम्ही गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर गृहनिर्माण वित्त कंपनी एचडीएफसी (Housing Finance Company HDFC Home Loan Offer) ची विशेष ऑफर या महिन्यात 31 ऑक्टोबर रोजी संपेल. एचडीएफसीने सणासुदीचा हंगाम (Festive Season Home Loan Offer) लक्षात घेऊन गृहकर्जाचे दर कमी केले आहेत. या अंतर्गत ग्राहक प्रारंभिक 6.70% व्याज दराने गृहकर्ज घेऊ शकतात. ही विशेष योजना 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत उपलब्ध असेल.

२. पीएम किसान योजनेसाठी नोंदणी

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी (PM Kisan Beneficiaries) करण्यासाठी शेतकऱ्यांना 31 ऑक्टोबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे. जर त्यांनी या काळात योजनेसाठी नोंदणी केली, तर त्यांना दोन हप्तांचा लाभ मिळेल, अर्थात त्यांच्या खात्यात 4,000 रुपयांचा लाभ येईल.

३. वाहन नोंदणी आणि DL रिन्यू करा

तुमच्या वाहनाची नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स (Renew your Driving license) आणि फिटनेस प्रमाणपत्र यासारख्या कागदपत्रांच्या नूतनीकरणाची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला ही कागदपत्रे रिन्यू करायची असतील तर हे काम लवकरात लवकर पूर्ण करा. तुम्ही असे न केल्यास तुम्हाला अडचणीला सामोरे जावे लागू शकते. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय परिवहन मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स (DL), नोंदणी प्रमाणपत्र (RC) आणि परमिटची वैधता 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *