Ola Electric Scooter : दिवाळीनंतर Ola इलेक्ट्रिक स्कूटर टेस्ट राइडसाठी सज्ज असणार, कंपनीकडून घोषणा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २०ऑक्टोबर । जर तुम्ही ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल. पण खरेदी करण्यापूर्वी तुम्ही एक टेस्ट राइड घ्यायची असेल तर तुमची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. चेन्नईस्थित इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता ओला कंपनीने घोषणा केली आहे की, दिवाळीनंतर आपल्या ग्राहकांना एस 1 आणि एस 1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटरची टेस्ट राइड ऑफर करण्यासाठी तयार आहे. तसेच, 10 नोव्हेंबरपासून इलेक्ट्रिक स्कूटर टेस्ट राइडसाठी उपलब्ध असतील, असे कंपनीने म्हटले आहे.

ओला इलेक्ट्रिकने आपल्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर एस 1 आणि एस 1 प्रो या 15 ऑगस्ट रोजी भारतीय बाजारात 1 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह लाँच केल्या आहेत. या दोन्ही स्कूटर लाँच झाल्यानंतर एक महिन्यानंतर ओला इलेक्ट्रिकने दोन दिवसांसाठी त्यांची बुकिंग उघडली. कंपनीने सांगितले की, त्याने केवळ दोन दिवसांत 1,100 कोटी रुपयांहून अधिकचा ऑनलाइन व्यवसाय केला आहे. कंपनीला पहिल्या 24 तासातच 600 कोटी रुपयांचे बुकिंग मिळाले होते. आता या स्कूटरच्या बुकिंगचा दुसरा टप्पा दिवाळीच्या आधी म्हणजे 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

ओला इलेक्ट्रिक स्कूटरचे एस 1 व्हेरिएंट एकदा फुल चार्जिंग केल्यानंतर 121 किलोमीटर अंतर कापू शकते. तर एस 1 प्रो व्हेरिएंट एकदा फुल चार्जिंग केल्यानंतर 181 किमी पर्यंत अंतर कापू शकतो. एस 1 व्हेरिएंट 3.6 सेकंदात 0 ते 40 किमी प्रति तास वेग पकडते. तर एस 1 प्रो व्हेरिएंट 3 सेकंदात 0 ते 40 किलोमीटर प्रति तास वेग पकडू शकते. त्याचबरोबर या स्कूटरची टॉप स्पीड 115 किमी प्रतितास आहे.

ओला एस 1 प्रोमध्ये 3.97 kWh ची खूप मोठी बॅटरी क्षमता देण्यात आली आहे. ओला एस 1 प्रोची बॅटरी उच्च क्षमतेची युनिट असल्याने पूर्ण चार्ज होण्यास जास्त वेळ लागतो. पूर्ण चार्ज होण्यासाठी 6 तास 30 मिनिटे लागतात. ओला इलेक्ट्रिकचा दावा आहे की, एस 1 प्रो ची बॅटरी फक्त 18 मिनिटांत 50 टक्के चार्ज होऊ शकते आणि 75 किमीच्या ड्रायव्हिंग रेंजला पुरेशी असावी.

ओला इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कलर निवडण्यासाठी एकूण 10 ऑप्शन आहेत. बुकिंग दरम्यान पसंतीचा कलर निवडला जाऊ शकतो आणि कंपनीच्या वेबसाइटनुसार, ग्राहकाला हवे असल्यास स्कूटरचा कलर ऑप्शन नंतर बदलता येतो.

ओला इलेक्ट्रिकने या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती आधीच जाहीर केल्या आहेत. ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या एस 1 व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 99,999 रुपये आहे. तर एस 1 प्रो व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 1,29,999 रुपये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *