महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. 21 ऑक्टोबर । पेट्रोल-डिझेल(Petrol-Diesel Price)च्या किंमती दररोज नवा विक्रम करत आहेत. देशांतर्गत तेल कंपन्यांनी आज म्हणजेच 21 ऑक्टोबरसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी केले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 35 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. बुधवारीही दिल्लीसह देशातील सर्व राज्यांमध्ये इंधनाचे दर वाढवण्यात आले होते. सतत वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे.
राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 106.54 रुपये प्रति लिटरवर गेला आहे तर डिझेल 96.27 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत 33 पैशांनी वाढ झाली असून आता ते 112.44 कुरए प्रति लिटर दराने विकले जात आहे. तसेच, डिझेलच्या किंमतीमध्येही 37 पैशांनी वाढ झाली असून आता ते 103.26 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.
प्रमुख शहरांमधील आजचा दर
>> दिल्ली पेट्रोल 106.54 रुपये आणि डिझेल 95.27 रुपये प्रति लिटर
>> मुंबई पेट्रोल 112.44 रुपये आणि डिझेल 103.26 रुपये प्रति लिर
>> चेन्नई पेट्रोल 103.61 रुपये आणि डिझेल 99.59 रुपये प्रति लिटर
>> कोलकाता पेट्रोल 107.11 रुपये आणि डिझेल 98.38 रुपये प्रति लिटर
ऑक्टोबरमध्ये 5 रुपयांनी वाढ
आतापर्यंत ऑक्टोबर महिन्यात इंधनाचे दर 15 पटींपेक्षा जास्त वाढवण्यात आले आहेत. फक्त तीन दिवस वगळता दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. ऑक्टोबरमध्येच पेट्रोल 4.80 रुपयांनी महाग झाले आहे, तर डिझेल 5 रुपयांनी वाढले आहे. कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असताना, पेट्रोल आणि डिझेलचे दरही सातत्याने वाढत आहेत.