नाशिकात 6 नोव्हेंबरपासून हेल्मेटसक्तीचा तिसरा टप्पा ; कडक कारवाई होणार …

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ ऑक्टोबर । नाशिक शहरात हेल्मेटसक्तीचा तिसरा टप्पा पुढील महिन्यापासून राबवला जाणार असून यामध्ये शहरातील शासकीय, निमशासकीय कार्यालयांच्या आवारात विना हेल्मेट दुचाकीचालकाला प्रवेश बंदी करण्याचा निर्णय पोलीस आयुक्तांनी घेतला आहे. (The third phase of compulsory helmet rule from November 6 in Nashik; Strict action to be taken)

शहरात 29 जुलैपासून हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात नो हेल्मेट नो पेट्रोल, त्यानंतर विनाहेल्मेट दुचाकीचालकांचं 2 तास समुपदेशानंतर आता हेल्मेट नसल्यास कोणतही सहकार्य न करण्याचा निर्णय पोलीस आयुक्तांनी घेतला आहे. तसा आदेशच पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी काढलाय. त्यानुसार 6 नोव्हेंबरपासून शहरात शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांच्या आवारात विनाहेल्मेट दुचाकीचालकास प्रवेश बंदी केली जाणार आहे. शहरातील शाळा, कॉलेज, विद्यापीठ, कोचिंग क्लासेस, सर्व पार्किंग ठिकाणं, औद्योगिक क्षेत्र, शासकीय कार्यालये, महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि अन्य निमशासकीय कार्यालयांमध्ये विनाहेल्मेट दुचाकीचालकास प्रवेश बंदी केली जाणार आहे. या सर्व ठिकाणी व पेट्रोलपंपावर सीसीटीव्ही बंधनकारक करण्यात आले आहेत.

शासकीय आणि निमशासकीय कार्यालयाच्या आवारात विनाहेल्मेट दुचाकीचालक आढळून आल्यास त्यास 8 दिवसांचा तुरुंगवास अथवा बाराशे रुपये दंड केला जाणार आहे. वाहतूक विभागाची भरारी पथके शासकीय आणि निमशासकीय ठिकाणी तपासणी करून संबंधित चालकांवर कारवाई करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *