महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ ऑक्टोबर । टी२० वर्ल्डकपच्या (t 20 world cup) सुपर १२ ग्रुपच्या दुसऱ्या सामन्यात काल पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून दारुण पराभव केला. वर्ल्डकपच्या इतिहासात प्रथमच पाकिस्तानने (pakistan) भारताला नमवलं. या पराभवानंतर भारताचा माजी कर्णधार एम.एस.धोनीची (Ms dhoni) सोशल मीडियावर चर्चा आहे. ‘मिस यू धोनी’ म्हणूनही अनेकांनी टि्वट केलं आहे. या सामन्यानंतर मैदानावर खिलाडूवृत्तीचं दर्शन घडवणारे काही फोटो व्हायरल झाले आहेत.
यात कर्णधार विराट कोहली, बाबर आझमचा एक फोटो आहे. सामन्यानंतर धोनीने पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू इमाद वसिम, माजी कर्णधार शोएब मलिक आणि कर्णधार बाबर आझम यांच्यासोबत मैदानावर चर्चा केली. तो फोटो व्हायरल झाला आहे. आयसीसीने धोनी पाकिस्तानी क्रिकेटपटूंसोबत संवाद साधत असल्याचा एक व्हिडीओ टि्वटरवर पोस्ट केला आहे.
या व्हिडीओला “कितीही वातावरण निर्मिती केली, तरी भारत-पाकिस्तान सामन्याची हीच खरी कथा आहे” असे कॅप्शन या व्हीडीओ दिले आहे. काल भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी १५२ धावांचे लक्ष्य ठेवलं होतं.
पाकिस्तानची सलामीची जोडी कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानने एकही विकेट न गमावता हे लक्ष्य पार केलं. या विजयासह पाकिस्तानने वर्ल्डकपमध्ये भारताकडून पराभूत होण्याची आपली परंपरा खंडीत केली.