1 KG इंधनावर 260 KM धावते ; जगातील सर्वाधिक मायलेज देणारी कार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ ऑक्टोबर । पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol and diesel ) सतत वाढणाऱ्या किंमतीमुळे जगाला पर्यायी इंधनांचा विचार करण्यास भाग पाडले आहे. भारतासह अनेक देश वेगाने इलेक्ट्रिक वाहनांकडे (EV) वळत आहेत. मात्र, जपान असा एक देश आहे की तो हायड्रोजनचा इंधनाला प्राधान्य देत आहे. जपानप्रमाणे काही देशांनी हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर सुरू केला आहे.

260 किमी प्रति किलो मायलेज
अलीकडेच, जपानी ऑटोमेकर टोयोटाच्या (Toyota) मिराई (Mirai) कारने हायड्रोजन इंधनावर सर्वात लांब अंतर कापण्याचा जागतिक विक्रमही केला आहे. या विक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही Guinness World Record) करण्यात आली आहे. या कारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे एकदा इंधन भरल्यानंतर 1360 किमीचा प्रवास पूर्ण केला. या कालावधीत एकूण 5.65 किलो हायड्रोजन वापरण्यात आले. यानुसार, कारने 260 किमी प्रति किलोचे मायलेज दिले.

ही कार 2016 मध्ये झाली होती लॉन्च
कंपनीच्या मते, टोयोटा मिराई (Toyota Mirai)2016 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. हे कंपनीचे पहिले फ्युएल सेल Electric vehicle म्हणजेच हायड्रोजन इंधनावर चालणारी कार होय. ही कार उत्तर अमेरिकेत रिटेल विक्रीसाठी उपलब्ध आहे. अधिक सोप्या पद्धतीने सांगायचे झाले तर, हायड्रोजन इंधनाचा वापर लोकांसाठी बराचसा सिद्ध होणार आहे. तथापि, भारतात आतापर्यंत हायड्रोजन इंधनाकडे पर्याय म्हणून पाहिले जात नाही.

वास्तविक, हायड्रोजनचे उत्पादन खूप महाग आहे. या महागाईमुळे याकडे योग्य पर्याय म्हणून पाहिले गेले नाही. परंतु नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने हायड्रोजन उत्पादनाचा खर्च सातत्याने कमी होत आहे. भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी रिलायन्स पेट्रोलियमचे मालक मुकेश अंबानी यांनी एका निवेदनात म्हटले होते की, पुढील दशकात हायड्रोजन उत्पादनाची किंमत प्रति किलो एक डॉलरच्या पातळीवर येऊ शकते.

इलेक्ट्रिक कार vs हायड्रोजन कार
जीवाश्म इंधनांना पर्याय म्हणून इलेक्ट्रिक कारचा वापर केला जातो. परंतु आतापर्यंत बनवलेल्या सर्व इलेक्ट्रिक कार केवळ एका चार्जनंतर सुमारे 500 किमीचे मायलेज देतात. यानंतर, अशा कार चार्ज करण्यासाठी चार्जिंग स्टेशनची व्यवस्था करणे हा सर्वात मोठा अडथळा आहे. या गाड्या चार्ज करण्यासाठी लागणारा वेळ, हा दुसरा अडथळा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *