पेन्शनधारक (Pensioners News) ; नियमित पेन्शन हवी असल्यास पूर्ण करा हे काम, 30 नोव्हेंबर आहे डेडलाइन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ ऑक्टोबर । तुम्ही देखील पेन्शनधारक (Pensioners News) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. दरवर्षी पेन्शनधारकांना एक महत्त्वाचे काम पूर्ण करावे लागते, ते म्हणजे तुमचे लाइफ सर्टिफिकेट (Life Certificate Submission Last Date) जमा करणे. यावर्षी लाइफ सर्टिफिकेट जमा करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर आहे. हे काम पूर्ण न केल्यास तुम्हाला पेन्शन मिळण्यास अडथळा येऊ शकतो. जाणून घ्या कोणत्या पद्धतीने जीवन प्रमाणपत्र जमा करता येईल.

पोर्टलवर जमा करा जीवन प्रमाणपत्र तुम्ही https://jeevanpramaan.gov.in/ या पोर्टलवर तुमचं लाइफ सर्टिफिकेट जमा करू शकता. तुम्ही जीवन प्रमाणपत्र अॅप सुद्धा डाउनलोड करू शकता. याशिवाय UDAI द्वारे मान्य फिंगरप्रिंट डिव्हाइस देखील असणे आवश्यक आहे. यानंतर तुम्ही ईमेल आयडी आणि App मध्ये सांगण्यात आलेल्या पद्धतीनुसार जीवन प्रमाणपत्र घरबसल्या जमा करू शकता.

वाचा-Gold Rate Today: सोन्याच्या घरात मोठी घसरण! आज 8059 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं

घरबसल्या जमा करता येईल सर्टिफिकेट

निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पेन्शनधारक 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या डोअरस्टेप बँकिंग अलायन्स किंवा पोस्ट विभागाच्या डोरस्टेप सेवेचा वापर करून डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात.

या बँका देतायंत सेवा

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया या बँका ही सेवा देत आहेत. तुम्ही वेबसाइट (doorstepbanks.com किंवा www.dsb.imfast.co.in/doorstep/login) किंवा ‘डोअरस्टेप बँकिंग’ मोबाइल अॅप्लिकेशनवर किंवा टोल-फ्री नंबरवर कॉल करून (18001213721 किंवा 18001037188) बँकांची डोअरस्टेप सेवा मिळवू शकता.

इंडिया पोस्टने सुरू केली खास सेवा

केंद्र सरकारच्या निर्णयानुसार ज्येष्ठ नागरिकांना आता हे सर्टिफिकेट जमा करण्यासाठी बँकेपर्यंत येण्याची आवश्यकता नाही. आता इंडिया पोस्‍ट पेमेंट्स बँकेचे (India Post Payments Bank) 1.89 लाख टपाल सेवक हे प्रमाणपत्र त्यांच्या घरून घेऊन बँक किंवा संबंधित विभागाकडे जमा करतील. केंद्र सरकारने आता 80 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ पेन्शनधारकांसाठी (Pensioners) महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *