Diwali Chiwda Recipe : दिवाळीत सगळ्यांच्या आवडीचा खमंग चिवडा कसा कराल? चला पाहू या…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ ऑक्टोबर । सणासुदीचे दिवस सुरू झाले की, स्पेशल रेसिपी बनवणं हा एक रिवाज आहे. प्रत्येक सणाची काही स्पेशल रेसिपी असते. त्यात दिवाळी हा महत्वाचा सण आहे. कारण, या सणामध्ये अनेक रेसिपी असतात. लाडू, चिवडा (Chiwda Recipe), करंजी, चकली, शंकरपाळी, कापण्या, शेव, अनारसे, भाकरवडी अशा अनेर रेसिपींची मेजवाणीच असते. त्यातील आज महाराष्ट्रातील खास ‘चिवडा’ रेसिपी

१) पाव किलो पातळ पोहे

२) तीन वाट्या कुरमुरे

३) दोन वाट्या सुक्या खोपऱ्याचे काप

४) दीड वाटी शेंगदाणे

५) एक वाटी हरभरा डाळ

६) एक वाटी कढीपत्ता

७) एक चमचा धणे पूड

८) एक चमचा जिरे पूड

९) एक चमचा पिठीसाखर

१०) एक चमचा लाल तिखट

११) दीड चमचा हळद

१२) एक चमचा आमचूर

१३) दीड वाटी तेल

१४) मोहरी, हिंग, लसूण, कोथिंबीर, ३-४ मिरच्या

कृती

१) सर्वांत पहिल्यांदा लसूण, कोथिंबीर आणि मिरच्या एकत्र करून वाटून घ्या.

२) मध्यम गॅसवर कढई ठेवून सर्व पोहे कुरकुरीत भाजून घ्या. ते भाजत असताना सातत्याने भाजू नका. थोडे-थोडे पोहे घालून भाजा. हॅंडल असलेली कढई असेल तर जास्त चांगली. कारण, त्याच्या हलक्या हातान पोहे भाजून घेता येतात. अशा पद्धतीने कुरमुरेदेखील भाजून घ्या.

३) त्यानंतर पुन्हा गॅसवर कढई ठेवून त्यात तेल घालून खोबऱ्याचे काप तळून घ्या. नंतर शेंगदाणे तळून घ्या. शेवटी डाळ तळून घ्या. तिन्हीही वेगवेगळे बाजूला काढून घ्या.

४) गॅसवरील कढईतील तेलात मोहरी घालून फोडणी करा आणि त्यात कढीपत्ता व हिंग घाला.

५) त्यानंतर वाटलेल्या मसाला टाका. हा मसाला कोरडा होऊपर्यंत हलवत रहा. त्यात हळद घाला आणि त्यानंतर गॅस बंद करा.

६) तेलात परतलेल्या मसाल्यावर पोहे, कुरमुरे, तळलेले दाणे, खोबऱ्याचे काप, डाळ घाला. तसेच धणे, जिरे, पिठीसाखर, आमचूर, तिखट, मीठ घाला.

७) सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र करा. त्यानंतर ते सगळं मिश्रण एका कागदावर काढून घ्या. पुन्हा त्याला हातान व्यवस्थित मिक्स करून घ्या. अशाप्रकारे दिवाळीचा चिवडा (Chiwda Recipe) तयार झाला आहे. तो एका डब्यामध्ये घालून व्यवस्थित झाकण लावून ठेवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *