Gold Price: दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात घट, सोनं रेकॉर्ड स्तरापेक्षा स्वस्त

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ ऑक्टोबर । दिवाळीपूर्वी सोन्याच्या भावात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. बुधवारी मल्टी कमोडिटी (MCX) वर सोन्याच्या किंमतीत 0.10 टक्क्यांनी घट झाली आहे. या घसरणीनंतर सोने 47,765 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आले आहे. तर आज चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. एमसीएक्सवर चांदी 0.09 टक्क्यांच्या वाढीसह 65050 रुपये प्रतिकिलोच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

गेल्यावर्षीच्या याच कालावधीची तुलना केल्यास सध्या सोने जवळपास 4 हजारांनी स्वस्त आहे. गेल्या वर्षी MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत या दिवशी 51,079 रुपये होती, आज सोन्याची किंमत 47,765 रुपये आहे. याचा अर्थ विक्रमी पातळीपेक्षा 3,314 रुपयांनी स्वस्त विकले जात आहेत.

सोन्याचा भाव 50 हजारांपर्यंत जाणार?
सोन्याच्या सध्याच्या किंमती पाहता, आता सोन्यात गुंतवणूक करायची की थांबवायची, असा प्रश्न गुंतवणूकदार आणि दागिने खरेदी करणाऱ्यांच्या मोठ्या वर्गासमोर आहे. तज्ज्ञांच्या मते, गेल्या काही काळापासून सोन्याच्या किxमतीत सातत्याने वाढ होत आहे. सोन्याची मागणी अशीच वाढत राहिल्यास दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 50,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे आत्ताच सोने खरेदी केल्यास तुमचे बरेच पैसे वाचू शकतात.

यंदाच्या दिवाळीत सोनं स्वस्तात मिळणार?
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत सोनं स्वस्त राहण्याचा अंदाज नाशिकमधील सराफा व्यापाऱ्यांकडून वर्तविण्यात आला आहे. गेल्यावर्षी दिवाळीच्या काळात सोन्याचा प्रतितोळा दर 51000 रुपये इतका होता. मात्र, यंदा सोन्याचा प्रतितोळा दर 47000 ते 47500 रुपये इतका असेल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.

सोन्याचा भाव 57 हजार रुपयांवरून 60 हजार रुपयांपर्यंत जाणार
दिवाळी ते डिसेंबरपर्यंत सोन्याचा भाव 57 हजार रुपयांवरून 60 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो. म्हणजेच सध्या सुरू असलेल्या किमती 14 हजार प्रति 10 ग्रॅमपर्यंत वाढू शकतात. चांदीचा विचार केल्यास त्यातही मोठी वाढ होऊ शकते. दिवाळीपर्यंत किंवा वर्षअखेरीस चांदीचे भाव 76,000 ते 82,000 रुपये प्रतिकिलोपर्यंत जातील, असे बहुतांश व्यापाऱ्यांचे मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *