राज्यातील शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ऑक्टोबर । School Diwali Holiday News :आता बातमी आहे विद्यार्थ्यांसाठी. राज्यातल्या शाळांना उद्यापासून दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 10 नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी असणार आहे. दरम्यान, मुंबईतील शाळांना दिवाळीची 1 ते 20 नोव्हेंबर दरम्यान सुट्टी देण्यात आली आहे. शिक्षण निरीक्षकांनी शाळांना 1 ते 20 नोव्हेंबर सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत. (12-day Diwali holiday announced for schools in Maharashtra)

दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असतानाही दिवाळीची सुट्टी जाहीर झाली नव्हती. त्यामुळे शाळा कधीपर्यंत सुरु राहणार आणि सुट्टी कधी लागणार याची उत्सुकता होती. आज सरकारने राज्यातील शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत ही सुट्टी असणार आहे. अर्थात शाळांना दिवाळीच्या 12 दिवस सुट्टी असेल.

शाळांमध्ये सुट्ट्या जाहीर झाल्या नव्हती त्यामुळे पालक आणि शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. राज्यातील अन्य विभागात शाळांना दिवाळीच्या सुट्या जाहीर करण्यात आल्या होत्या. मुंबईत मात्र शाळांकडून दिवाळीची सुट्टी जाहीर झाली नव्हती त्यामुळे पालकांना दिवाळीच्या सुट्टीतले नियोजन करता येत नव्हते.

कोरोनामुळे मागील दीड वर्षात अनेक पालक आपल्या गावी जाऊ शकले नाहीत. आता कोरोना संसर्ग थोडा कमी झाल्याने अनेक पालक आपल्या मूळ गावी वा अन्य ठिकाणी जाण्यासाठी तयारी करीत आहे. त्यासाठी रेल्वेचे आरक्षण करणे गरजेचे आहे. मात्र, उद्यापासून सुट्टी जाहीर करण्यात आल्याने थोडीसी नाराजी असली तर अनेकांनी आनंद व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *