महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ ऑक्टोबर । दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार (Govt Employees) आणखी एक गिफ्ट देणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर 2021 च्या पगारात डीएची थकबाकीही (DA Arrear) मिळणार आहे. अलीकडेच मोदी सरकारने महागाई भत्ता 3 (Dearness allowance) टक्क्यांनी वाढवून 31 टक्के केलाय. अर्थ मंत्रालयाने 1 जुलै 2021 पासून वाढीव डीएदेखील लागू केलाय. ऑक्टोबरमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही एकूण 4 महिन्यांची डीएची थकबाकी मिळणार असल्याचे स्पष्ट झालेय. त्यामुळे त्यांना या महिन्यात वाढीव पगार मिळणार आहे.
वाढीव DA ची गणना
सातव्या वेतन आयोगाअंतर्गत (7th Pay commission) महागाई भत्त्यात वाढ मूळ वेतनाच्या आधारे केली जाते. डीए वाढीमुळे 47 लाखांहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी आणि 68.62 लाख पेन्शनधारकांना थेट फायदा होणार आहे. सरकारने म्हटले आहे की, महागाई भत्ता आणि महागाई मदत (DR) यामुळे सरकारी तिजोरीवरील खर्च दरवर्षी 9,488.70 कोटी रुपयांनी वाढेल. दोन वेगवेगळ्या पगारांच्या आधारे DA मधील वाढ समजून घेऊयात.
मूळ पगारावर 56,900 रुपये डीए
जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 56,900 रुपये असेल, तर नवीन महागाई भत्ता 31 टक्के दराने 17,639 रुपये प्रति महिना, तर 15,932 रुपये प्रति महिना 28 टक्के दराने उपलब्ध होईल. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास महागाई भत्ता दरमहा 1,707 रुपयांनी वाढेल. या आधारावर पगारात दरवर्षी 20,484 रुपयांनी वाढ होईल. ऑक्टोबरमध्ये 3 महिन्यांची थकबाकी मिळाल्यास 52,917 रुपयेही येतील. जर तुम्हाला ऑक्टोबर महिन्याची थकबाकी मिळाली, तर तुम्हाला 4 महिन्यांसाठी 70,556 रुपये मिळतील.
मूळ पगारावर 18,000 रुपये डीए
तुमचा मूळ पगार 18,000 रुपये असल्यास 28 टक्के दराने तुम्हाला 5,030 रुपये महागाई भत्ता मिळत आहे. त्यात 3 टक्क्यांनी वाढ झाली. आता 31 टक्के दराने डीए मिळेल. आता 31 टक्के दराने 5,580 रुपये डीए म्हणून मिळणार आहेत, म्हणजेच कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18,000 रुपये असल्यास डीएमध्ये 540 रुपयांची वाढ होणार आहे. आता अतिरिक्त 1,620 रुपये तीन महिन्यांच्या डीए थकबाकीच्या रूपात पगारात येतील.
महागाई भत्ता दुसऱ्यांदा वाढला
जुलै 2021 मध्ये केंद्र सरकारने महागाई भत्त्याचा दर 17 टक्क्यांवरून 28 टक्के केला होता. आता सरकारने दुसऱ्यांदा डीए 3 टक्क्यांनी वाढवून 31 टक्के केला. महागाई भत्ता हा कर्मचार्यांच्या मूळ पगाराचा एक निश्चित भाग आहे. देशातील महागाईचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देते. ती वेळोवेळी वाढवली जाते. पेन्शनधारकांना हा लाभ महागाई सवलतीच्या रूपात मिळतो.