महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ ऑक्टोबर । दोन दिवसांच्या स्थिरतेनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ झाल्यानंतर देशभरात तेलाचे दर सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत. सरकारी मालकीच्या तेल कंपन्या IOC, HPCL आणि BPCL यांनी गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 35 पैशांनी वाढ केली आहे. देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 108.29 रुपयांवर पोहोचली आहे. तसेच डिझेलचा दर आता 97.02 रुपये प्रतिलिटर झाला आहे.
दिल्लीतील पेट्रोलचा दर 108.29 रुपये प्रति लिटर आहे.
मुंबईत पेट्रोलचा दर 114.14 रुपये आणि डिझेलचा दर 105.12 रुपये प्रतिलिटर आहे.
कोलकात्यात पेट्रोलचा दर 108.78 रुपये आणि डिझेलचा दर 100.14 रुपये प्रति लिटर आहे.
चेन्नईमध्ये पेट्रोल 105.13 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 101.25 रुपये प्रति लिटर आहे.
भारतात इंधनदरात वाढ
देशातील इंधनाच्या किमती गेल्या 15 महिन्यांत 35 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे भविष्यात देशात जास्त मायलेज देणाऱ्या 10 लाख रुपयांपेक्षा कमी श्रेणीती गाड्यांची मागणी वाढू शकते, असे एचएसबीसी ग्लोबल रिसर्चच्या अहवालात म्हटले आहे. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.
आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.