T20 World Cup: वेस्ट इंडिजच्या या अनुभवी ऑल राऊंडरची टीममध्ये एन्ट्री

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ ऑक्टोबर । गतविजेत्या वेस्ट इंडिजसाठी (West Indies Cricket Team) हा टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) निराशाजनक ठरतोय. टीमनं सलग दोन मॅच गमावल्या आहेत. त्यातच खेळाडूंच्या दुखापतींमुळे मॅनेजमेंटची चिंता वाढली आहे. या स्पर्धेच्या पहिल्याच आठवड्यात वेस्ट इंडिज टीममधील दुसरा खेळाडू स्पर्धेतून आऊट झाला आहे. फास्ट बॉलर ओबेड मकॉय (Obed McCoy) दुखापतीमुळे स्पर्धेतून आऊट झालाय. यापूर्वी फॅबियन एलनला देखील दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलं होतं.

मकॉयच्या जागी अनुभवी ऑल राऊंडर जेसन होल्डरचा (Jason Holder) टीममध्ये समावेश करण्यात आलाय. होल्डरच्या समावेशासाठी आयसीसीनं परवानगी दिली आहे. मकॉयनं या स्पर्धेतील वॉर्म अप मॅच आणि इंग्लंड विरुद्धचा पहिला सामना केला होता. इंग्लंड विरुद्ध त्यानं फक्त 2 ओव्हर बॉलिंग केली आणि 12 रन दिले. त्या मॅचमध्ये त्याला एकही विकेट मिळाली नव्हती.

वेस्ट इंडिजला होणार फायदा

जेसन होल्डरच्या अनुभवाचा वेस्ट इंडिजला फायदा होणार आहे. त्यानं नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) सनरायझर्स हैदराबादकडून (SRH) बॅटींग आणि बॉलिंगमध्ये चांगली कामगिरी केली होती. सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी वेस्ट इंडिजला आला उर्वरित तिन्ही मॅच मोठ्या फरकानं जिंकाव्या लागणार आहेत.

T20 World Cup: न्यूझीलंडविरुद्ध मिटणार विराटची डोकेदुखी, दुबईतून आली Good News

न्यूझीलंडवरही दुखापतीचं सावट

वेस्ट इंडिज प्रमाणेच न्यूझीलंडवरही दुखापतीचं सावट आहे. भारताविरुद्धच्या मॅचपूर्वी टीमकडून सर्वाधिक रन करणारा मार्टिन गप्टील (Martin Guptill) दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे त्याच्या खेळण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मॅचवेळी हारिस राऊफने (Harris Rauf) टाकलेला बॉल गप्टीलच्या पायाच्या अंगठ्याला लागला. या मॅचमध्ये गप्टील 17 रन करून आऊट झाला.

न्यूझीलंडचे कोच गॅरी स्टीड यांनी पाकिस्तानविरुद्धच्या मॅचनंतर सांगितलं की आम्ही गप्टीलची दुखापत किती जास्त आहे ते बघू, सध्या त्याला त्रास होत आहे, पुढचे 24 ते 48 तास महत्त्वाचे असतील. न्यूझीलंडच्या टीमसाठी हा दुसरा धक्का आहे, कारण गप्टील आधी फास्ट बॉलर लॉकी फर्ग्युसनही दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *