गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांना करोनाचा संसर्ग; वर्षभरात दुसऱ्यांदा करोना पॉझिटिव्ह

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ ऑक्टोबर । राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना करोनाची लागण झाली आहे. ट्वीट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. याआधीही दिलीप वळसे पाटील यांना करोना झाला होता. वर्षभरात दुसऱ्यांदा त्यांना करोनाची लागण झाली आहे.

दिलीप वळसे पाटील यांनी ट्वीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “करोनासदृश्य लक्षणं दिसत असल्याने मी माझी चाचणी केली असून करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहे”.

“नागपूर व अमरावती दौऱ्यादरम्यान तसंच इतर कार्यक्रमाप्रसंगी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझं आवाहन आहे की, त्यांना लक्षणे आढळून आल्यास करोना चाचणी करून घ्यावी. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं व करोना नियमांचं काटेकोर पालन करावं,” असं दिलीप वळसे पाटील यांनी ट्वीटमध्ये सांगितलं आहे.

याआधी गतवर्षी २९ ऑक्टोबरला दिलीप वळसे पाटील यांना करोनाची लागण झाली होती. दैनंदिन कामकाजासाठी सकाळी ते मंत्रालयात उपस्थित होते. अहवाल येताच ते घरी परतले होते. त्यावेळीही त्यांनी ट्वीट करत माहिती दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *